कसाब बाबत न्यायालय आज निर्णय देईल. सगळ्याच भारतीयांना, देशभक्तांना त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, हीच अपेक्षा आहे. कसाब याला पोटाचे दुखणे..? असल्याची बातमी आज झळकली आहे. कदाचित त्याला भीतीने "पोटात दुखत असावे". पण भीती आणि कसाबला? कसे शक्य आहे? नाहीतर हे इतकं झालंच नसतं..। त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये बुलेटप्रुफ कक्ष तयार करण्यात येणार आहे असेही वृत्त प्रसिद्ध झाले आहे. परंतु याची गरज तरी काय? इतक्या निरपराधांना ठार मारणार्यांना अशा सुविधा देऊन सहानुभूती कशाला हवी? पाकिस्तान मधील भारतीयांना, चुकून गुन्हेगार म्हणून पकडण्यात आलेल्यांना कशी वागणूक दिली जाते आहे, हे भारत सरकारला माहिती नाही काय? इतके करोडो रूपये खर्च करून सरकारला काय सिद्ध करायचे आहे?
खरंतर, अशा प्रकारच्या गुन्हेगारांना थेट पोलिस किंवा संरक्षण यंत्रणांच्या ताब्यात दिले पाहिजे. यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर थेट फाशी..अशी तरतूद नव्याने करण्याची गरज आहे. कारण अशा अनेक अतिरेक्यांना अद्याप काहीच झालेले नाही. उलट त्यांची अशा प्रकारे सरबराई करणे म्हणजे त्यांच्यापुढे झुकण्यासारखे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानच्या तुरुंगात असताना दुखण्यात देखील शिक्षेत ठरलेली कामे करावी लागत होतीच हे इतिहास सांगतो. मग आम्हा सामान्य नागरिकांना इतिहासाचा आदर्श घालून देऊन स्वतः असे वागण्याचा सरकारचा उद्देश काय? दिव्याखाली अंधार असतो..हेच इथे सिद्ध होते. अर्थात इथे अंधाराचाच दिवा असल्यासारखी स्थिती आहे.
सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला
सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...