कसाब बाबत न्यायालय आज निर्णय देईल. सगळ्याच भारतीयांना, देशभक्तांना त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, हीच अपेक्षा आहे. कसाब याला पोटाचे दुखणे..? असल्याची बातमी आज झळकली आहे. कदाचित त्याला भीतीने "पोटात दुखत असावे". पण भीती आणि कसाबला? कसे शक्य आहे? नाहीतर हे इतकं झालंच नसतं..। त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये बुलेटप्रुफ कक्ष तयार करण्यात येणार आहे असेही वृत्त प्रसिद्ध झाले आहे. परंतु याची गरज तरी काय? इतक्या निरपराधांना ठार मारणार्यांना अशा सुविधा देऊन सहानुभूती कशाला हवी? पाकिस्तान मधील भारतीयांना, चुकून गुन्हेगार म्हणून पकडण्यात आलेल्यांना कशी वागणूक दिली जाते आहे, हे भारत सरकारला माहिती नाही काय? इतके करोडो रूपये खर्च करून सरकारला काय सिद्ध करायचे आहे? खरंतर, अशा प्रकारच्या गुन्हेगारांना थेट पोलिस किंवा संरक्षण यंत्रणांच्या ताब्यात दिले पाहिजे. यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर थेट फाशी..अशी तरतूद नव्याने करण्याची गरज आहे. कारण अशा अनेक अतिरेक्यांना अद्याप काहीच झालेले नाही. उलट त्यांची अशा प्रकारे सरबराई करणे म्हणजे त्यांच्यापुढे झुकण्यासारखे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अं...