मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मराठी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

...अखेर "हिंग्लिश" च्या पगड्याची पगडी बसली डोक्यावर!

आज कालच्या मुलांना भेसळीचे खाण्याची सवय झाली आहे, शुद्ध तुपातले अन्न खाल्ले तर, त्यांचे पोट बिघडते, अपचन होते...अशी वाक्य अनेकदा ऐकू येतात. देशातल्या अनेक भाषांच्या बाबतीतही जवळपास असेच झाले आहे. प्रामुख्याने देशात व्यवहारासाठी वापरल्या जाणार्‍या दोन प्रमुख भाषा मानण्यात येणार्‍या हिंदी आणि इंग्रजी यांचे मिश्रण म्हणजेच हिंग्लिश वापरण्याची मुभा शासनानेच आता अप्रत्यक्षपणे दिली आहे... अवघ्या दशकापूर्वी अतिशय शुद्ध स्वरूपात बोलल्या जाणार्‍या जवळपास अनेक प्रादेशिक भाषांमध्ये आता इंग्रजीने शिरकाव केला आहे. देशावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या ब्रिटिशांनी देश सोडून जाता-जाता चहा आणि सॉरी हे दोन शब्द इथेच सोडले, अन् बस्स...चहा नसला तर अनेकांना चुकल्यासारखे वाटणे, कामे न होणे यासारखेच अगदी भाषांचेही झाले आहे. दररोजच्या बोलण्यात, शब्दप्रयोगात इंग्रजी शब्द नसला तर चुकल्यासारखे वाटते. काही वर्षांपूर्वी मोठ्या शहरांपासून याला अप्रत्यक्षरित्या सुरूवात झाल्याचे जाणवते, नव्हे, इंग्रजी चा मोठ्या प्रमाणावर भाषांमध्ये शिरकाव होणार असल्याचे जणू ते सूतोवाच ठरले.. अनेक सुशिक्षित अथवा मोठ्या शहरांमध्ये शिकण

किती उरली आहे अस्खलित मराठी...?

  दिवसेंदिवस जग जवळ येतंय, तसा माणूस माणसापासून दूर जातोय. टीव्ही, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, इंटरनेट, कॉम्प्यूटर अशा विविध माध्यमांमुळे होणारी प्रगती आणि विकास नाकारता येणार नाही. परंतू माणूस माणसापासून दूर जातोय हे कटूसत्य आहे. काही वर्षांपूर्वी मातृभाषेसह एखादी भाषा बोलता येणारी व्यक्ती आता किमान चार भाषा बोलू लागली आहे. मात्र भोवतालच्या वातावरणामुळे बऱ्याच अंशी कित्येकांच्या, विशेषतः मराठी बांधवांच्या भाषेवर विपरित परिणाम झाला आहे. अन्य मातृभाषा असलेले परंतू महाराष्ट्रात राहणारे बांधव एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेतच साधतात. आमचा मराठी बांधव मात्र एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेत बोलण्याऐवजी अन्य भाषेत बोलतो. मध्य प्रदेशाकाही राज्यांमध्ये तर सर्रासपणे हे पहावयास मिळते. आजी-आजोबा मराठी बोलतात, आई-वडिल मराठी-हिंदी भाषेत बोलतात आणि तिसरी पिढी म्हणजेच मुलं..या मुलांना तर मराठी अगदी कमी बोलता येतं..! त्यांचे पालक देखील त्यांच्याशी जास्तीत जास्त हिंदीमध्येच बोलतात. हिंदी भाषेचा येथे विरोध नाही, मात्र आपली मातृभाषा विसरता कामा नये, मातृभाषा यायलाच पाहिजे हे संस्कार आपल्या मुलांवर कर