मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी

मुंबई, ता. 28 - येत्या एक मे स महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षस्थानी असतील. नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील ११.१० किमी लांबीच्या व ११ स्थानकांचा समावेश असलेल्या "बेलापुर ते पेंढार" मार्गिका क्रमांक एक चे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वेस्थानक (नियोजित) सेक्टर - २४, खारघर, नवी मुंबई येथे रविवारी (ता. १) संध्याकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असून यावेळी, जलसंपदामंत्री व रायगडचे पालकमंत्री सुनिल तटकरे, राज्य उत्पादन शुल्क व ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्यासह खासदार गजानन बाबर, संजीव नाईक,  आमदार व सिडको चे संचालक सुभाष भोईर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विवेक पाटील, संदीप नाईक, आदी म

मध्य प्रदेशही तापले...

गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशात दिवसाचे कमाल ३८ अंश सेल्सिअसवर स्थिरावलेले तापमान वाढून काल (ता. २८ एप्रिल) कमाल ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काही भागात पारा ४१ अंश सेल्सिअसवर सरकला आहे. उन्हामुळे दुपारी रस्त्यावर वर्दळ कमी झाली असून अनेक ठिकाणी ऊसाचा रस, कोल्ड्रिंक, शीत पेयांची दुकाने थाटलेली दिसत आहेत. काही भागात दिवसातून अनेकदा विद्युत पुरवठा खंडीत होत असून रात्रीही डासांचा त्रास होत असल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. नागरी वस्त्यांमध्ये डासांचा उपद्रव झाला असून नागरीकांनी प्रशासनाकडे परीसरात स्वच्छता करण्याची मागणी केली आहे.

सुट्टीची भटकंती...(७)

आज सकाळी माझी तब्येत जरा बिघडली होती. पोटही बिघडलं होतं थोडं...। असं वाटलं की काल हॉटेलचं खाल्लेलं पचलं नसावं. आज जेवण न करण्याचा विचार करून मी मामीला तसं सांगितलं. मामी म्हणाली, अरे काही नाही..दुपारपर्यंत सगळं ठीक होईल बघं. इकडे ये बरं जरा...। मी मामीने बोलावल्यानंतर मामीच्या मागोमाग माजघरात गेलो. तिथे कपाटावर एक पेटी ठेवली होती..हीच पेटी माझ्यासाठी जादूची पेटी ठरली आणि मी दुपारी आंब्याच्या रसावर ताव मारला...ही पेटी म्हणजेच आपण ऐकून असलेला "आजीबाईचा बटवा" होता. नेहमी नाही पण केव्हातरी गरज भासत असल्यामुळे पेटीरुपी हा आजीबाईचा बटवा मामीने वर ठेवला होता. मी उंच असल्यामुळे आणि मामासुद्धा शेतावर गेलेला असल्यामुळे मलाच ही पेटी खाली काढायला मामीने सांगितलं. यातलं एक औषध मामीने मला दिलं त्यावर गरम पाणी प्यायलो आणि काय? अकराच्या सुमारास एकदा 'तिकडे' जाऊन फटाक्यांच्या आवाजासह सारं काही मस्त होऊन पोट मोकळं झालं, त्यानंतर थोड्या वेळातच पुन्हा एकदा छान वाटू लागलं. मामीने मला एक चूर्ण दिलं होतं हे चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतलं. नेमकं कोणतं चूर्ण असेल याची उत्कंठा शिगेला पोहोचल्यामु

नारायण आठवले यांच्या निधनामुळे पत्रकारितेच्या क्षेत्राची मोठी हानी - छगन भुजबळ

मुंबई, दि. 28 : ज्येष्ठ पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक नारायण आठवले यांच्या निधनामुळे पत्रकारिता व साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. व्यक्तिगत पातळीवर माझा एक चांगला मित्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, नारायण आठवले यांनी भारतीय स्वातंत्र्यलढयाबरोबरच गोवा मुक्ती संग्रामातही सक्रिय योगदान दिले. 'लोकमित्र', 'लोकसत्ता' या दैनिकांतील पत्रकारितेबरोबरच 'गोमंतक'चे संपादक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले. विविध सामाजिक, राजकीय विषयांवर त्यांनी सोप्या भाषेत परंतु अत्यंत नि:पक्षपाती व परखड लिखाण केले. सत्तरच्या दशकात आम्ही चालविलेल्या 'प्रभंजन' या साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही नारायण आठवले यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली. या साप्ताहिकात 'अनिरुध्द पुनर्वसु' या टोपणनावाने त्यांनी केलेले ललित लेखन त्या काळात खूप गाजले. 'चित्रलेखा'मधील त्यांचे लेखही चांगलेच गाजले. सन 1996मध्ये शिव

सुट्टीची भटकंती...(६)

...सकाळी उठून गावात फेरफटका मारावा या उद्देशाने तयार झालो आणि गावात गेलो. अगदी गावाच्या सीमेपर्यंत पोहोचलो. गावाच्या सीमेवर अगदी टिप्पीकल वास येत होता...तसाच उलट पावली परत फिरलो. शासनाची शौचालयासंदर्भात असलेली योजना स्वीकारण्यास अजूनही ग्रामस्थ मंडळी तयार नाहीत असं दिसलं. ठराविक घरांमध्येच किंवा घराबाहेर सिट्स बसविल्याचं लक्षात आलं. खरंतर शासनाच्या अनेक चांगल्या योजना असतात, पण त्या व्यवस्थित राबविल्या जात नसाव्या किंवा पोहोचत नसाव्या. खर्च तर होऊन जातो, हे मी तुम्हांला मागेही सांगितलंच (कदाचित हा उल्लेख अनेकदा होईल). हो, एक मात्र आहे. शासनाने ग्राम स्वच्छता चांगल्या प्रकारे राबविणार्‍या ग्रामपंचायतीला, पालिकेला बक्षिस, पुरस्कार, काही सवलती जाहीर केला असल्यामुळे अनेक गावं ही योजना चांगल्या प्रकारे कशी राबवता येईल, यशस्वी कशी होईल याचा विचार करतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीही करतात. या गावात सुद्धा तसंच चित्र होतं. गावात ठिकठिकाणी गल्लीच्या कोपर्‍यावर कचरा-कुंडी ठेवली होती. तसंच कचरा गोळा करण्यासाठी दररोज सकाळी ठराविक वेळेत कचरा उचलणारी गाडी, कर्मचारी किंवा घंटागाडी येत होती. ही घंटागाडी

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी डंकन फ्लेचर

झिंबाब्वे चे माजी कसोटीपटू डंकन फ्लेचर यांची भारतीय संघाचा कोच (प्रशिक्षक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती असेल. श्री. फ्लेचर यांनी यापूर्वी इंग्लंड संघाचे प्रशिक्षकपद सुमारे आठ वर्षे भूषविले आहे. अधिक माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही.

सुट्टीची भटकंती...(५)

आज सकाळी मला जाग आली, ती कोणाच्या तरी भांडणामुळे...। ओसरीवर जाऊन पाहिलं तर, सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून दोन महिलांमध्ये भांडण सुरू होतं. पाण्यासाठी नंबर लावण्यावरून हे भांडण असल्याचं लक्षात आलं...इथे विषय भांडणाचा असला, तरी ग्रामीण भागात अजूनही विशिष्ट वेळेत ग्रामपंचायत पाणी पुरवठा करते. आजकाल शहरांमध्येही असंच चित्र पहायला मिळतं. ग्रामीण भागात मात्र अन्य वेळात पाण्याच्या टाकीखाली असलेल्या नळावरून किंवा पाणवठ्याच्या जागेवरून पाणी आणावं लागतं. आजकाल तसं सगळ्याच ठिकाणी 'ससे' अर्थात समाजसेवक झाले आहेत, ते टँकरद्वारे पिण्याचे पाणी अथवा वापरण्यासाठी पाणी उपलब्ध करून देतात, हे वेगळं. तसंच जमीनीत बोअरिंग करून सुद्धा गेल्या दशकापासून खासगी रितीने स्वतःसाठी पाणी उपलब्ध करून घेतलं जातं. मामाच्या गावात फिरताना काही ठिकाणी गोबर गॅस ही संकल्पना दिसली. गावामध्ये जवळपास प्रत्येकाकडे गाई, म्हशी असतातच. यांच्या शेणापासून गवर्‍या थापून झाल्यानंतर उर्वरित शेण या गॅससाठी वापरलं जातं, तसंच बर्‍याचदा प्लॅस्टिक विरहित कचरा सुद्धा लोक यात टाकताना दिसतात. पण यामुळे पैशाची बचत होते असं म्हणतात. याल

मलंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली प्रकल्पास अंतिम मंजूरी: कामाला लवकरच सुरवात

हाजी मलंगगड (ता. अंबरनाथ, जि. ठाणे) येथे येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक फ्युनिक्युलर यंत्रणा बसविण्याच्या प्रकल्पास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत काल (ता. २५) अंतिम मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरवात करता येणार आहे. राज्यातील उंचावरील देवस्थानांच्या ठिकाणी फ्युनिक्युलर ट्रॉली बसविण्याची संकल्पना मांडणार्‍या सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा यासाठी मोलाचा ठरला आहे. हाजी मलंगगडासह सप्तशृंगी गड, माहुर गड आणि जेजुरी या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी फ्युनिक्युलर ट्रॉली बसविण्याची कल्पना श्री. भुजबळ यांनी मांडली होती. सप्तशृंगी गडावरही फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम लवकरच सुरू होणार असून उर्वरित दोन गडांवरील कामेही लवकरच मंजूर केली जातील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. हाजी मलंगगड येथे प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी १० मार्च २००८ ला मिळाली असली तरीही हा प्रकल्प माथेरान इकोसेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असून याला माथेरान मॉनिटरिंग कमिटी तसेच केंद्रीय वन व पर्यावरणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली

अगोदर भारतीयांचाच विचार करावा...

शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला भारत पेट्रोल आणि डिझेल निर्यात करण्यास तयार आहे. देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचे दर वाढत आहेत.सरकारने पाकिस्तानला पेट्रोल आणि डिझेल निर्यात कऱण्याऐवजी देशातील नागरिकांना सुरळीत आणि स्वस्त पुरवठा कसा होऊ शकेल? याचा विचार गांभीर्याने करण्याची आवश्यकता आहे.

सुट्टीची भटकंती...(४)

घरी परतल्यानंतर थोडा वेळ टीव्ही पाहू म्हटलं...। पण तेवढ्यात वीज गेली...झालं...। ग्रामीण भागात सध्या जवळपास दहा तास दररोज वीज (भार-नियमन) जाते. ग्रामीण भागासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना कुठे जातात कुणास ठाऊक? बहुदा फक्त कागदोपत्रीच असाव्यात असं मला वाटतंय. शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजे...हे शासनाचं धोरण कुठे गेलं? आणि इतकी वीज घालवून ग्रामीण भागावर कितीतरी अन्याय केला जातोय. बिच्चारे शेतकरी बांधव...खरंच त्यांची कीव करावी असंच वाटतं. वास्तविक गरीब असो, की श्रीमंत...सगळ्यांना भूक तर लागतेच. सगळ्यांना दररोज जेवण लागतंच. केवळ महाराष्ट्रच नाही, संपूर्ण देशच कृषि अर्थातच शेतीसाठी ग्रामीण भागावर अवलंबून आहे. परिणामी शासनाने ही बाब गांभीर्याने इतके दिवस विचारात का घेतली नाही? वीजेचा तुटवडा काही एकदम होत नाही. आपल्याला एखादा मोठा आजार व्हायचा असेल तर शरीर जसे आधी सूचना देतं, त्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र नक्की मोठा असा आजार, विकार जडतो. अगदी तस्सच इथेही आहे, पण तसं झालं तर शासन आणि राजकारण काय ते? अशा नाना प्रश्नांचं काहुर माजलं. शेवटी विचार केला, मिस्टर कूल..होण्य