मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

रायगड लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शिवकालिन रायगड पुन्हा उभारण्यासाठी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करणार: भुजबळ

मुंबई ता. ४ - शिवकालिन रायगड जसाच्या तसा उभारण्यासाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी केंद्रीयमंत्री, केंद्रीय सचिवांसह भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठांशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. याबाबत श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यासह त्यांनी रायगडखेरीज राज्यातील अन्य पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांच्या संवर्धनाच्या कामाबाबतही पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली.

...तर रायगड जसाच्या तसा उभारू! -भुजबळ

मुंबई, ता. २२- केंद्र शासनाने रायगडच्या पुनरुज्जीवनाची आणि सुशोभीकरणाची परवानगी दिल्यास शिवकालीन रायगड जसाच्या तसा उभा करून दाखवू, असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. "केसरी गौरव सन्मान २०१० पुरस्कार" वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, राज्याला छत्रपती शिवरायांचा थोर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातले सुमारे साडेतीनशे गडकिल्ले त्याची थोरवी सांगतात. पर्यटनाच्या दृष्टीने हे खूप महत्वाचे आहे. छत्रपतींचा हा वारसा जपून ठेवण्यासाठी त्यांची डागडुजी व सुशोभीकरण आवश्यक आहे. परंतु यासंदर्भात पुरातत्त्व खात्याचे नियम कडक आहेत. पडझड झालेल्या या गडकिल्ल्यांना भेट देऊन आपण छत्रपतींच्या आस्तित्वानं पावन झालेली माती अभिमानाने कपाळावर लावतो, मात्र इथे भेट देणार्‍या परदेशी पर्यटकांच्या मनात ही भावना असणं शक्य नसतं. ती निर्माण होण्यासाठी किमान तशा कल्पना येण्यासाठी तरी काही वास्तू आपण उभ्या करायला हव्यात. यासाठी प्रयोगादाखल रायगडच्या पुनरुज्जीवनाचं आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यास परवानगी देण्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामार्फत आपण व