मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सुरेश कलमाडी यांना अटक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणी प्रमुख संशयित म्हणून ठपका ठेवण्यात आलेले खासदार आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना आज (सोमवार ता. २५ एप्रिल) सीबीआय ने अटक केली. सीबीआय ने कलमाडी यांना यापूर्वी अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. आजही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिली.

सुट्टीची भटकंती...(३)

पहाटे पाच वाजताच मामाने उठवलं. मी फ्रेश होईपर्यंत मामीने चहा टाकला होता. त्या चहाला काय चव होती सांगू? व्वा. कधी नव्हे ते शुद्ध आणि धारोष्ण दूध होते त्या चहात. त्यामुळे तो चहा इतका छान लागत होता, की अगदी ३-४ कप प्यावासा वाटत होता...। शेत गावापासून थोडं दूर असल्यामुळे बाईकने जाऊ या, असं मामाने सांगितल्यानंतर मी बाईकऐवजी बैलगाडीने जाऊ असं म्हटल्यानंतर मामालाही आनंद झाला. जोडी गाडीला जुंपून पांथस्थ झालो. सकाळच्या त्या आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागातल्या त्या रस्त्यावर बैलांच्या गळ्यातली घंटा मंजूळ स्वरांनी भारल्याप्रमाणे वाजत होती, ते छान वाटत होतं. वाटेत भेटणारा जवळपास प्रत्येकजणच मामाला रामराम...। करत होता. शेत जवळ येऊ लागलं तशी कच्ची वाट लागली...आणि पाहता-पाहता आमच्यापुढे नकळत सात-आठ बैलगाड्या दिसल्या आणि मी आवाक झालो. गावाकडचे लोक किती लवकर उठतात आणि शेतावर जातात हे लक्षात येऊन काही अंशी माझी स्वतःची आणि शहराची तुलना करू लागलो...असो। ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळी सातला शेतात पोहोचलो. शेतात पोहोचल्यानंतर बैलांची जोडी मामाने एका मोठ्या झाडाखाली बांधली. आम्ही पुढे गेलो, परंतू शेत

चिंतन ग्रुप पुणे तर्फे राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार उत्साहात

पुणे - येथील चिंतन ग्रुपतर्फे आयोजित, राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कार नाशिक विभागातर्फे स्वीकारताना स्नेहलता कोल्हे.

"महाराष्ट्राचं पर्यटन" जागतिक नकाशावर...!

महाराष्ट्र शासनानं सन 2011-12 हे वर्ष 'पर्यटन वर्ष' म्हणून साजरं करण्याचं ठरवलं आहे. राज्यातल्या पर्यटन व्यवसायाला खऱ्या अर्थानं चालना मिळण्यासाठी आणि पर्यटन वर्ष यशस्वी होण्यासाठी राज्याचा पर्यटनमंत्री म्हणून मला पर्यटनाशी संबंधित सर्व घटकांचं उत्स्फूर्त सहकार्य अपेक्षित आहे. पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्या, उद्योजक, टूर ऑपरेटर्स, 'बेड ऍन्ड ब्रेकफास्ट' योजनेचे चालक, बस व टॅक्सीचालक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व पर्यटक मंडळींचं सहकार्यही मोलाचं ठरणार आहे. सांगत आहेत महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ... (शब्दांकन व सौजन्यः आलोक जत्राटकर) ' लोकराज्य ' मासिकातर्फे यंदा एप्रिलचा अंक हा 'पर्यटन विशेषांक' म्हणून प्रकाशित करण्यात येत असल्याचं समजून अत्यंत आनंद वाटला. या विशेषांकाला मी मनापासून शुभेच्छा देतो. पर्यटन हा आजघडीला आपल्या देशातला एक महत्त्वपूर्ण उद्योग आहे. या क्षेत्रातली रोजगारनिर्मितीही मोठी आहे. पर्यटन क्षेत्रात दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून किमान 40 प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होत असते. राष्ट्रीय सकल उत्पन्

ये पब्लिक है...

शनिवारी (ता. २३ एप्रिल) इंदूरचा नवीन बांधण्यात आलेला भंडारी मिलचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुलाच्या कडेला लावण्यात आलेले व लोकांनी खराब केलेले हे चित्र.

ये पब्लिक है...

शनिवारी (ता. २३ एप्रिल) इंदूरचा नवीन बांधण्यात आलेला भंडारी मिलचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुलाच्या कडेला लावण्यात आलेले व लोकांनी खराब केलेले हे चित्र.

सुट्टीची भटकंती...(२)

सुट्टीच्या पहिल्या दिवशी ठरल्याप्रमाणे सिनेमा पाहून झाला...आठवडाभर पोटभर झोप झाली...पुढे काय? गावी मामाकडे जायचं की पुण्याला काकांकडे? असा प्रश्न पडला (तसं तर सगळ्याच नातेवाईकांनी सुट्टीत बोलावलं होतं) पण ठरवलं, की गावी जायचं... ठरल्याप्रमाणे गावी मामाकडे गेलो. शहर आणि गावाच्या वातावरणात फरक पडतोच नां..। गावात बस पोहोचल्यानंतर बस-स्टँड पर्यंत जाणार्‍या रस्त्यावर इतक्या सकाळी सुद्धा वर्दळ होती. स्टँडवर मामा घ्यायला आला होता. मामाच्या घरी जाताना वाटेत अनेकजण रामराम, नमस्कार करत होते. मनात विचार आले, खरंच किती छान..त्यानिमित्ताने संवाद तरी साधला जातो एकमेकांशी. नाहीतर, आमच्या मोठ्या शहरात अगदी घराच्या ओट्यावर बाहेर बसलेले शेजारी  तोंडातून चकार शब्द काढायला सुद्धा तयार होत नाहीत. पाहूणे म्हणून आलेल्या एखाद्या व्यक्तीने कोणाचा पत्ता विचारला तर केवळ हातानेच इशारा केला जातो किंवा खुणावले जाते. इथे तर पहा, अगदी सगळं वातावरणच जीवंत असल्यासारखं आणि चैतन्य असल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मला नकळत हुरुप आला. कदाचित गावाच्या मातीचा आणि वातावरणाचा हा परिणाम असावा. मामाचा मोठ्ठा वाडा होता त्यामुळे आ

गौरव पुरस्काराचा...

नवी दिल्ली येथे गुरूवारी (२१ एप्रिल) अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कारप्राप्त पुरस्कारार्थी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या समवेत.

विजय नाहाटा यांचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

नवी दिल्ली येथे डीजीआयपीआर महाराष्ट्र चे महासंचालक विजय नाहाटा यांना आज (२१ एप्रिल) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कार देताना.

विहंगावलोकन

उडुनी नभी उन्हात विहंग दमले पहा दमुनी पंख्यावरी अहो बसलो मिनिटे दहा जाहलो उष्म्याने अवघा बावळा.. आहे शुभ्र पंखा..काळा मी कावळा.. .