मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मदत लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आई, तू रडू नकोस...

"प्लास्टिक ऍनिमिया" झालेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकल्या कृष्णाचे हे बोल आहेत...त्याला झालेल्या असाध्य रोगामुळे आणि डॉक्टरांनी त्याला आता अवघ्या एका महिन्याची मुदत दिल्यामुळे दिवसभर रडणार्‍या आणि आसुसलेल्या डोळ्यांनी आपल्या पिटुकल्याला डोळे भरून पाहणार्‍या आईला कृष्णा सारखा समजावत असतो. आपण वाचणार नाही याची जाणीव असलेला सहा वर्षांचा कृष्णा हा चिमुरडा मात्र बिनधास्त आहे. कृष्णाच्या शरीरात नवीन रक्त तयार होणे जवळजवळ बंद झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. त्याचे गरीब आई-वडील पैशाअभावी त्याच्यावर औषधोपचार करण्यात असमर्थ ठरले आहेत. इंदूरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये कृष्णावर उपचार सुरू आहेत. चार महिन्यातून सहा वेळा त्याला "ओ पॉझिटीव्ह" रक्त देण्यात आले आहे. डॉक्टरांनी कृष्णाच्या आई-वडिलांना बोनमॅरो ट्रान्सप्लँटेशनचा आणखी एक सल्ला दिला आहे. परंतू यासाठी, त्यांच्याजवळ नसलेल्या आणि इतके जमवणे शक्य नसलेल्या १५ लाख रुपयांची गरज आहे. कृष्णाचे वडील आरएस कुशवाह मजूर असून त्यांच्या डोक्यावर अगोदरचाच सुमारे दीड लाख रुपयांचे अक्षरशः ओझे आहे. कृष्णाची बहिण नंदिनी कृष्णासाठी देवापुढे