मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

घनकचरा व्यवस्थापन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

घनकचरा प्रकल्पाबाबत नव्याने प्रस्ताव सादर करावा

मुंबई, ता. १८ - मीरा-भाईंदर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठीच्या जागेबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका विविध समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रांतर्गत उत्तन पाली येथील सध्या कार्यरत असलेल्या प्रकल्पाऐवजी वरसावे येथे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव होता. परंतु वरसावे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आरक्षित केलेली जमीन केंद्र शासनाच्या निकषानुरुप नसल्यामुळे प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. येथील शाळांच्या थकित भाड्याबाबत शासनाच्या धोरणानुसारच निर्णय घेण्यात यावा असेही पवार यांनी सांगितले. बैठकीस पाणीपुरवठा स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, खासदार संजीव नाईक, राज्यमंत्री सचिन अहिर, राजेंद्र गावित, आमदार गिल्बर्ट मेंडोसा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या मुख्य सचिव मालिनी शंकर, नगरविकास विभाग सचिव मनुकुमार श्रीवास्तव, जलसंपदा विभाग सचिव एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.