मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सिडको भूखंड वाटप लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नवी मुंबई प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या १२.५ टक्के भूखंड वाटप

मुंबई, ता. २ - नवी मुंबई प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचे प्रकल्पग्रस्त खातेदारांना शासन निर्णयाप्रमाणे १२.५ टक्के भूखंड वाटप करण्यात येत असून, या भूखंड वाटपाच्या संचिकेतील माहिती मिळणेसाठी प्रकल्पग्रस्त खातेदारांना सिडको कार्यालयात वारंवार यावे लागू नये, या उद्देशाने भूमी व भूमापन विभागातर्फे प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या नावांची व संचिका क्रमांकाची यादी तयार करण्यात आली आहे. सिडको भवन येथील माहिती केंद्रात व www.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून या यादीत तालुकानिहाय प्रत्येक गावातील भूधारकाच्या संचिकांचा तपशील जसे संचिका क्रमांक, पात्रता धारकाचे नाव याबाबत माहिती तसेच ज्या भूधारकांची पात्रता शिल्लक आहे त्यांची ज्येष्ठता यादी उपलब्ध असून, यापुढे ज्येष्ठतेनुसार भूखंडांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ६७९१, ८१०५/८१०६ या क्रमांकावर संपर्क साधून व वरील संकेतस्थळावर आपल्या संचिकेचा तपशील प्राप्त करू शकतात.