मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सिडको लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सिडको मेट्रो मार्ग क्र. 1अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; लवकरच करारनामा

सिडको महामंडळाकडून विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 च्या परिचालन आणि देखभाल (ऑपरेशन ॲन्ड मेन्टेनन्स) सेवांकरिता, सिडकोकडून नुकतेच महामेट्रोला स्वीकारपत्र (एलओए) देण्यात आले आहे. मार्ग क्र. १ अंमलबजावणीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.  दरम्यान, या संदर्भात लवकरच सिडको आणि महामेट्रो यांच्यात करारनामा करण्यात येणार आहे. “नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाची नवी मुंबईकरांना अनेक वर्षे प्रतीक्षा आहे. लवकरात लवकर हा मेट्रो प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रकल्पासमोरील सर्व अडथळे आम्ही दूर केले आहेत. महामेट्रोने नागपूर मेट्रो विक्रमी वेळेत पूर्ण करून दर्जेदार प्रकल्प उभा केला. पुणे मेट्रोचे काम देखील महा मेट्रो वेगाने करत आहे. त्यामुळे त्यांची आजवरची कामगिरी बघता नवी मुंबई मेट्रो देखील लवकरात लवकर कार्यान्वित करून प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल, असा मला विश्वास आहे.” - एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री, महाराष्ट्र मेट्रो मार्ग क्र. 1 च्या अभियांत्रिकी सहाय्यासाठी महामेट्रोची नियुक्ती करण्यात आल्यानंतर, या मार्गावर परिचालन आणि देखभाल सेवा पु

सिडकोद्वारा कोपरखैरणे नोडमधील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

मुंबई, ता. 9 - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व 2012 च्या जनहित याचिका क्रमांक 138 नुसार सिडको किंवा महाराष्ट्र शासनातर्फे कोणताही विकास परवाना न घेता बांधकाम करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयातर्फे देण्यात आले आहेत. सिडकोने व महाराष्ट्र शासनाने या अनाधिकृत बांधकाम विषयी न्यायलयात याचिका दाखल केली होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. शिवराज एस. पाटील, सिडको व सिडको (उत्तर) अनधिकृत बांधकाम विभाग यांच्यातर्फे दि. 8 जून 2017 रोजी कोपरखैरणे नोड, ठाणे जिल्हा येथील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत कोपरखैरणे नोड सेक्टर-9 मधील बालाजी मल्टीप्लेक्सजवळ असलेल्या अनधिकृत गॅरेज, सर्व्हिस स्टेशन आणि फर्निचरचे दुकान यांच्यावर अनधिकृत बांधकाम विभागाने कारवाई करुन 8000 चौ.मी. परिसर अतिक्रमाणापासून मोकळा करण्यात आला. ही बांधकामे सिडकोतर्फे कोणताही विकास परवाना न घेता सिडकोच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आली असल्याने सिडकोतर्फे निष्कासित करण्यात आली. ही मोहिम अनधिकृत बांधकाम नियंत्रक (उत्तर) पी.बी.राजपूत, सहाय्यक अनधिकृत बांधक

अनधिकृत बांधकामांविरूध्द कारवाई होणारच – संजय भाटिया

नवी मुंबई, ता. ८ एप्रिल - नवी मुंबईतील ९५ गावठाणांच्या आसपासची अनधिकृत बांधकामे न्यायालयाच्या निर्णयानुसार पाडणे सिडकोला बंधनकारक असल्याने अशा १६५७ बांधकामाविरूध्दची कारवाई सिडको लवकरात लवकर करील अशी स्पष्ट ग्वाही सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय भाटिया यांनी आज दिली. जासई येथील आदर्श ग्राम योजनेअंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी श्री. भाटिया बोलत होते. नवी मुंबईत प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे त्यांच्या सततच्या मागणीनुसार नियमित करण्यासाठी समूह विकास योजनेद्वारे गावठाणांचा पुनर्विकास करण्याबाबतची अधिसूचना २०१४ मध्ये शासनाने प्रसिध्द केली होती. प्रकल्पग्रस्तांच्या हरकती व सूचनांचा विचार करून शासनाने सुधारित योजना तयार केली. पुनर्विकास करण्यात येणाऱ्या बांधकामांना ४ चटईक्षेत्र निर्देशांक देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ मार्च २०१५ रोजी विधिमंडळात केली होती. सर्व १६५७ अनधिकृत बांधकामे १ जानेवारी २०१३ नंतर बांधण्यात आली आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात अशी १०२१ बांधकामे आहेत तर सिडकोच्या क्षेत्

नवी मुंबईने पाडला स्वेच्छा सीसीटीव्ही कॅमेरा देखरेखीचा नवा पायंडा

नवी मुंबई, (प्रतिनिधी) - सीसीटीव्ही देखरेखीसाठी स्वेच्छेने आचारसंहिता राबविणारे नवी मुंबई हे देशातील पहिलेच शहर ठरले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता संभाव्य गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी छुप्या कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडकोने स्वेच्छा सीसीटीव्ही कॅमेरा देखरेखीची आचारसंहिता तयार केली. सिडको अधिकारकक्षेतील खाजगी तसेच सरकारी आस्थापनांनी या आचारसंहितेला मान्यता दिली आहे. सीसीटीव्ही प्रकल्पासाठी सिडकोने सुकाणू समिती स्थापन केली होती. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्री. राजेश अग्रवाल हे या समितीचे अध्यक्ष आहेत. प्राइसवॉटरहाऊसकूपर्स हे सिडकोचे या प्रकल्पासाठी सल्लागार आहेत. समितीने नवी मुंबईतील सर्व खाजगी आणि सरकारी संघटना, संस्था आणि कंपन्यांच्या वरिष्ठांशी या संहितेबाबत चर्चा करून ती निश्चित केली. या संहितेनुसार रेल्वे स्थानके, दुकाने, मॉल्स, चित्रपटगृह, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण प्रकल्प, कारखाने, गोदामे अशा विविध सार्वजनिक स्थळी छुपे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ही

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अर्हता विनंती निविदा 5 फेब्रुवारी रोजी

विशेष प्रतिनिधी- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अर्हता विनंती निविदा 5 फेब्रुवारी 2014 रोजी निघणार अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष श्री. प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज दिनांक 29 जानेवारी 2014 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. सिडकोच्या निर्मल मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. नामदेव भगत, संचालक, सिडको व श्री. वसंत भोईर, संचालक, सिडको उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने विमानतळातकरिता संपादित करावयाच्या जमीनीच्या मोबदल्यात सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार भूसंपादनाच्या मोबदल्यात भूधारकांना 22.5% जमीन मिळणार आहे. त्याचबरोबर पुनर्वसन आणि पुन:स्थापन संदर्भातीलही सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले आहे. यास बहुतांश प्रकल्पबाधित सहमत आहेत. काही गावांचा या पॅकेजला विरोध असून त्यांनाही या पॅकेजसंदर्भातील सविस्तर माहिती अवगत करून दिल्यास त्यांची सहमती मिळविणे शक्य होईल असेही श्री. हिंदुराव यांनी यावेळी सांगितले. अर्हता विनंती नि

सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प या नव्या गृहसंकुलाच्या योजनापुस्तिकेची विक्री 16 जानेवारीपासून सुरु

नवी मुंबई (खारघर)दि. १५ - महाराष्ट्रातील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण करणारे सिडको पुन्हा एकदा व्हॅलीशिल्प हा भव्य गृहप्रकल्प घेऊन येत आहे. नवी मुंबई, खारघर, सेक्टर 36 मध्ये साकारलेला हा गृहप्रकल्प 16 जानेवारी 2014 पासून लोकांसाठी खुला होत आहे. या प्रकल्पासाठीचे अर्ज 16 जानेवारी ते 5 फेबुवारी 2014 या काळात सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत तर शनिवारी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत उपलब्ध होतील. रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हे अर्ज उपलब्ध होणार नाहीत. व्हॅलीशिल्पच्या अर्जाची किंमत रुपये 500/- (+ रु. 25/- वॅट) एवढी असेल. हे अर्ज, तळ मजला, सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, तिसरा मजला, पणन विभाग-2, रायगड भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, अकरावा मजला, निर्मल, नरिमन पाँईट, मुंबई, टीजेएसबी सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा या ठिकाणी उपलब्ध होतील. अर्जदारांनी नोंदणी शुल्काच्या रकमेचा सिडको लिमिटेडच्या नावे काढलेला व नवी मुंबई येथे देय असलेल्या डीडी अथवा पे ऑर्डर सहीत अर्ज 20 फेबुवारी 2014 पर्यंत टीजेएसबी सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील कोणत्याही शाखेत

सिडको संचालक मंडळाची बैठक उत्साहात: वाळूज, द्रोणागिरी, नेरुळ विविध पायाभूत सुविधांच्या अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता

मुंबई, ता. 31 मे- सिडको संचालक मंडळाची विविध योजने अंतर्गत पायाभूत सुविधा अंदाजपत्रकीय बैठक नुकतीच झाली. बैठकीत विविध योजनांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. प्रमोद हिंदुराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उत्साहात संपन्न झाली. नवी मुंबईतील 12.5 टक्के योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता, प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण, विद्यावेतनात वाढ आणि समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास मंजुरी असे महत्वपूर्ण निर्णय सिडको संचालक मंडळाने घेतले. बैठकीस श्री. संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, श्री. मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव (नगर विकास-1) श्री. यु.पी.एस. मदान, महानगर आयुक्त, एमएमआरडीए, श्री. नामदेव भगत, संचालक, सिडको, श्री. वसंत भोईर, संचालक, सिडको उपस्थित होते. सर्व विषयासंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. नवी मुंबई प्रकल्पगस्तांच्या सामाजिक संस्थांतर्फे आयोजित उपकमांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणार असलेल्या सिडकोच्या समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास संचालक मंडळाने मंज

नवी मुंबई मेट्रो – आता वाटचाल 21 व्या शतकाच्याही पुढे

स्वयंपूर्ण नवी मुंबईतील भविष्याची गती सांभाळणारा तर्कसंगत आणि सुयोग्य प्रकल्प म्हणजे नवी मुंबई मेट्रो. परिवहनाच्या बृहद आराखड्यावर आधारीत बहुपर्यायी दळणवळण व्यवस्थांना पूर्णत्व देणे हाच मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा उद्देश. दिल्ली मेट्रो रेल्वे कॅार्पोरेशन आणि ली असोसिएट्‌स साऊथ एशिया यांच्या सूचनाबरहूकुम नवी मुंबईत पाच मार्गांचे जाळे विणले जाणार आहे. पूर्णत: उन्नत मार्गिकेवरून धावणारी ही मेट्रो पहिल्या टप्प्यात 11 कि.मी. अंतराच्या बेलापूर ते पेंधर क्षेत्रातील परिवहनाला नवे परिमाण देईल यात शंका नाही. रेल्वेने निर्धारित केलेल्या बांधकाम दर्जाच्या परिमाणांची काटेकोर पूर्णता जागे अभावी, जागेच्या पूर्व-नियोजित वापरामुळे अथवा आरक्षणामुळे होऊ न शकल्याने नवी मुंबईतील काही नोडस्‌ रेल्वे मार्गापासून वंचित राहिले. जनतेला सर्व सुविधा पुरविण्याचा वसा घेतलेल्या, नागरिकांच्या समस्यांची, मागण्यांची प्राथम्याने दखल घेणाऱ्या सिडको प्रशासनानं त्यावर काढलेला तोडगा म्हणजे नवी मुंबई मेट्रो. मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या शक्यतेबाबतचा सकारात्मक अहवाल दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाकडून प्राप्त होताच सिडकोने व्

विकास कामांची गती वाढविण्यासाठी प्रगतीशील रहा- प्रमोद हिंदूराव

नवी मुंबई, ता. १८- सिडकोतर्फे नवी मुंबईत अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प राबविले जात आहेत. या प्रकल्पांच्या विकास कामांची गती वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा दृढनिश्चय मनाशी बाळगा असे आवाहन सिडकोचे अध्यक्ष श्री. प्रमोद हिंदुराव यांनी केले.     दिनांक १७ सप्टेंबर २०१२ रोजी सिडको इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने आगरी कोळी संस्कृती भवन , नेरूळ येथे आयोजित अभियंता दिन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. तानाजी सत्रे , मुख्य अभियंता ( दक्षिण) श्री. संजय चौधरी , मुख्य अभियंता ( उत्तर) , श्री. केशव वरखेडकर , श्री. चेतन पंडित , श्री. प्रवीण दवणे , श्री. विजय कांबळे , श्री. संजय दाहेदार , श्री. रमेश गिरी प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या भाषणात श्री. हिंदुराव पुढे म्हणाले की , सिडकोने पर्यटन स्थळांच्या निर्मितीत   पुढाकार घेतला पाहिजे. भरीव कार्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. आपल्या पदाचा , शिक्षणाचा आणि