मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

विधानपरिषद प्रश्नोत्तरी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील: भुजबळ

मुंबई, दि. 21 मार्च : कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी आपले ठोस प्रयत्न सुरू असून येत्या वर्षभरात पर्यटन विकासाची जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यात येतील, असे राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले. विधान परिषद सदस्य सर्वश्री राजन तेली, संजय दत्त, भाई जगताप, परशुराम उपरकर, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल श्री. भुजबळ बोलत होते. श्री. भुजबळ यांनी यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणच्या पर्यटन विकासासाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोकण रिव्हिएरा सर्किट अंतर्गत सर्किट-1, सर्किट-2 व सर्किट-3 साठी अनुक्रमे 3 कोटी 2 लाख रुपये, 2 कोटी 88 लाख 54 हजार रुपये व 1 कोटी 34 लाख 42 हजार रुपयांचा निधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास प्राप्त झाला. हा सुमारे 8 कोटी रुपयांचा निधी पूर्ण खर्च झाला असून त्याअंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या माध्यमातून विजयदुर्ग येथील निवास