मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

राष्ट्रीय मतदार दिन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

१५ जानेवारी 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा होणार

दरवर्षी १५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यास केंद्राने हिरवा कंदील दिला आहे. मतदान करण्यात असलेली मतदारांची उदासीनता लक्षात घेऊन ही संकल्पना अस्तित्वात येत आहे. वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येतो. दिवसेंदिवस मतदारांची मतदान करण्याविषयी उदासीनता वाढत आहे. वारंवार होणारी सत्ता परिवर्तने आणि जनतेस मिळणार्‍या सुखसोयी हे याचे प्रमुख कारण असल्याने युवकांपासून ज्येष्ठ नागरिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यास मतदान केंद्रात जात नाहीत. कोणीही सत्तेवर आला तरी देखील काहीच करत नाही. यापेक्षा मतदान न केलेलेच बरे...! अशी मतदारांची भूमिका असते. यात बर्‍याच अंशी तथ्य देखील आहे, वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांची यादी निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी बनविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदारसंघातील नवीन मतदारांचा मेळावा भरविण्यात येईल. त्यांना ओळखपत्र व बॅज देण्यात येणार असून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. दरवर्षी सुमारे पंचवीस टक्के युवक मतदारयाद्यांसाठी नावनोंदणी करतात अथवा मतदान करतात असे सर्वेक्षणात आढळले असून यामुळेच राष्ट्रीय मतदार दि