मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

प्रीपेड वीज मीटर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

राज्यात प्रीपेड वीज मीटर बसविणार

मुंबई येथे मंत्रालयात प्रीपेड वीज मीटर योजनेचा शुभारंभ करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जा विभागाचे मुख्यसचिव सुब्रतो रथो, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आदी. मुंबई, ता. १ - मोबाईल फोनच्या धर्तीवर राज्यात वीज बिलासाठी प्रीपेड मीटर लावण्यास प्रारंभ झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेस आज सुरवात झाली. मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव सुब्रतो रथो, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात राज्यात सुमारे २५ हजार प्रीपेड वीजमीटर लावले जाणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे वीज मीटर लावणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. सुरवातीस पुणे, नागपूर, औरंगाबाद, पेण, कल्याण, कोल्हापूर परीसर तसेच महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा अशा पर्यटनस्थळी प्रीपेड वीजमीटर लावले जातील. प्रीपेड मीटर लावणार्‍या ग्राहकांना वीज बिलात पाच टक्के विशेष सवलत देण्यात येणार आहे. या मीटरमधील वैधता संपल्यानंतर ऑनलाईन रिचार्ज करण्याची सुविधा आहे. कुठल्याही राष्ट्रीय सणांच्या दिवशी किंवा सुटीच्या दिवशी र