मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाळू उर्फ अंकुश खाडे यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला कलावंत हरपला: अजित पवार

मुंबई, दि. 26: ज्येष्ठ तमाशा कलावंत बाळू उर्फ अंकुश खाडे यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला कलावंत हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, बाळू-काळू यांची जोडी म्हणजे लोककलेच्या क्षेत्रातील एक मोठे आकर्षण होते. लोककलेच्या माध्यमातून अनेक वर्षे त्यांनी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. ही जोडी म्हणजे अनेक यात्रा-जत्रांचेही महत्वाचे आकर्षण असायची. विविध वगनाट्यांमध्ये बाळू यांनी केलेल्या भूमिका खूपच गाजल्या. बाळू यांच्या भूमिका कायमस्वरुपी रसिकांच्या ह्रदयावर कोरल्या गेल्या आहेत. वगनाट्यांद्वारे त्यांनी अंद्धश्रद्धा आणि अस्पृश्यतेसारखे प्रश्न हाताळून सामाजिक समतेचा आणि न्यायाचा संदेश देण्याचेही काम केले आहे. शिक्षणाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांना त्यांनी वेळोवेळी मदतही केली आहे. त्यांनी अनेक संस्थांसाठी मोफत कार्यक्रमही केले आहेत. त्यातून त्यांनी सामाजिक भान जोपासण्याचे आणि वाढविण्याचे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य कायस्वरुपी आपल्या स्मरणात राहील.

शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील निर्णयाने माता-भगिनींचे जीवन सुरक्षित होण्यास मदत -- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 4 :- मुंबईच्या शक्ती मिल परिसरातील सामुहिक बलात्कार खटल्यातील तीन आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्याचा न्यायालयाचा निर्णय दूरगामी आणि विधायक परिणाम करणारा असून या निर्णयाने समाजात योग्य संदेश पोहचला आहे. यापुढे बलात्कारासारखे दुष्कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही आणि भविष्यात आपल्या माता, भगिनींचे जीवन सुरक्षित करण्यात हा निर्णय महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देतांना व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, दिल्लीतील निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर शासनाने बलात्कारासंदर्भातील कायदा अधिक कडक करुन ३७६ (ई) कलमाची तरतूद केली. या तरतुदीने बलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कलमाचा वापर पहिल्यांदा आपल्या राज्यात करावा लागावा हे दुर्दैवी असले तरी यापुढे असा गुन्हा करण्यास कुणी धजावू नये आणि या कायद्याचा वापर करण्याची वेळ देशात कुठेही येऊ नये, अशा पद्धतीचे निकोप वातावरण निर्माण झाले पाहिजे.न्यायालयाचा आजचा निर्णय महिलांच्या सुरक्षा आणि सुरक