मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

564 ग्रामपंचायतींच्या अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

मुंबई दि. 16 – एप्रिल ते जून, 2014 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा, पालघर, सिंदखेडराजा व लोणार या 3 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक तसेच अन्य नगरपरिषदांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा, उल्हासनगर, सोलापूर, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिकांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा तसेच जामनेर, अकोले, अक्कलकुवा, अहमदपूर आणि पोंभुर्णा या पंचायत समित्यांमधील रिक्त असलेल्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज जाहीर केला आहे. एप्रिल ते जून, 2014 या कालावधीत राज्यातील 22 जिल्ह्यातील एकूण 564 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मंगळवार दि. 4 मार्च ते शनिवार दि. 8 मार्च 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून सोमवार, दि. 10 मार्च 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक बुधवार दि. 12 मार्च 2014 हा असेल. नगरपरिषद निवडणुकांसाठी शुक्रवार दि.

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरूष) स्पर्धा- जळगाव, परभणी विद्यापीठांचे संघ स्पर्धेबाहेर

कोल्हापूर, दि. १४ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात आजपासून सुरू झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल पुरूष गटाच्या स्पर्धेमध्ये आज बाद फेरीच्या सामन्यांत गुजरात विद्यापीठ (अहमदाबाद), राजस्थान केंद्रीय विद्यापीठ (अजमेर), वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ (सूरत), पॅसिफिक विद्यापीठ (उदयपूर) आणि मोहनलाल सुकादिया विद्यापीठ (उदयपूर) यांच्या संघांनी विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या जळगाव आणि परभणीच्या संघांनी चुरशीची लढत देऊनही पहिल्याच दिवशी स्पर्धेबाहेर पडावे लागले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), महारामा प्रताप विद्यापीठ (उदयपूर) आणि धर्मसिंह देसाई विद्यापीठ (नाडियाद) या संघांनी उपस्थिती न दर्शविल्यामुळे अनुक्रमे चारोतार विद्यापीठ (चुंग, जि. आणंद), जनार्दन रायनगर राजस्थान विद्यापीठ (उदयपूर) आणि सरदार पटेल विद्यापीठ (वल्लभ वैद्यनगर) यांना पुढे चाल देण्यात आली. अत्यंत चुरशीच्या लढतीत अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठाने जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २५-१९, २५-१९, १२-२५, १६-२५, १५-१० असा ३-२ ने पराभव केला. जळगावच्या संघाने अ

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धांचे जल्लोषात उद्घाटन

कोल्हापूर, दि. १४ फेब्रुवारी: राष्ट्रीय व राज्य स्तरावर क्रीडा संघटनांचा प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना व्हॉलीबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून त्यासाठी युवा खेळाडूंकडूनही सहकार्य आणि प्रयत्नांची साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू संजय नाईक यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरूष) स्पर्धेचे उद्घाटन श्री. नाईक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. एन.जे. पवार अध्यक्षस्थानी; तर प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे प्रमुख उपस्थित होते. यावेळी कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, बीसीयुडी संचालक डॉ. ए.बी. राजगे वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यापीठाच्या क्रीडा व शारिरीक सांस्कृतिक मंडळाचे सदस्य डॉ. एस.एस. हुंसवाडकर, शांताराम माळी, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब सूर्यवंशी, रेफ्री मंडळाचे समन्वयक डॉ. सुनील चव्हाण, पी.एस. पंत आणि अतुल पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुंबई व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य व्हॉलीब

Anand Mahindra accepts Sustainable Development Leadership Award

February 06, 2014, New Delhi: Mr. Anand Mahindra, Chairman of the USD 16.7 billion Mahindra Group, today received the Sustainable Development Leadership Award from The Energy and Resources Institute (TERI). Mr. Mahindra accepted the award from External Affairs Minister, Mr. Salman Khurshid on behalf of the Mahindra Group, at a special ceremony held in the National Capital. Mr. Mahindra was presented with the award in recognition of the dynamic and visionary leadership he has shown in spearheading the Mahindra Group on the path of sustainability and environmental awareness. “With its dynamic and visionary approach, TERI has greatly contributed to the global dialogue on finding solutions to global problems in the fields of energy, environment and sustainable development and I am honoured to accept this award from them on behalf of the Mahindra Group,” said Mr. Anand Mahindra, Chairman, Mahindra Group. Instituted by TERI in 2005, the Sustainable Development Leadership Award felicitates