मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी सरासरी ५२ टक्के मतदान-सोमवारी मतमोजणी

मुंबई, ता. १२- मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी ५२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली व कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद झाली नाही, अशी माहिती राज्य निवडणुक आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेत ४७ प्रभागात एकूण ९५ जागा असून त्यासाठी एकूण ५१६ उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी सर्वत्र आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमवारी (ता. १३ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता मतमोजणी होईल, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.

राज्यातील ७,७५६ ग्रामपंचायतींच्या ९ सप्टेंबरला सार्वत्रिक निवडणुका

मुंबई, ता. १- राज्यातील ७ हजार ७५६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ९ सप्टेंबर २०१२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आज मध्यरात्रीपासून मतमोजणी होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील, असेही त्यांनी म्हटले आहे. नामनिर्देशनपत्रे २१ ऑगस्ट २०१२ ते २५ ऑगस्ट २०१२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. यांची छाननी २७ ऑगस्टला होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २९ ऑगस्ट असेल. त्याच दिवशी चिन्ह नेमून देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ९ सप्टेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होईल. दुसर्‍या दिवशी १० सप्टेंबरला मतमोजणी होईल. सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान घेण्यात येईल. उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करणे आवश्यक राहील. तसेच निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल. जिल्हानिहाय मतदान होणार्‍या ग्रामपंचायतींची संख्या अशी-  ठाणे ९८, रायगड २४७, रत्नागिरी २२६, सिंधुदुर्ग ३२९, नाशिक १८९, अहमदनगर २१०, धुळ