मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मृणाल गोरे यांना सिडको तर्फे श्रद्धांजली

मुंबई, ता. २० - राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून मृणालताई गोरे यांनी आपल्या सामाजिक लढ्याचा प्रवास सुरू केला तेव्हापासून गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्या सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन लढत होत्या. त्यांच्या निधनाने राज्याने एक तेजस्वी, झुंजार नेतृत्व गमावले आहे. या शब्दात सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी श्रीमती मृणालताई गोरे यांना श्रद्धांजली अपर्ण केली. ते पुढे म्हणाले, की पाण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर पाणीवाली बाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या मृणालताई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला. स्वा. अहिल्या रांगणेकर यांच्यासोबत त्यांनी महिला आणि पीडितांच्या सेवेत स्वतःस झोकून दिले. नागरी प्रश्न, महिलांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, भटक्या विमुक्तांचे, झोपडपट्टीवासीयांचे प्रश्न अथवा महागाईविरोधी लढा असो, मृणालताईंनी सर्वसामान्यांची साथ कधीही सोडली नाही. त्यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेली पहिली महिला लोकप्रतिनिधी बनण्याचा विक्रम करून दाखविला. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविकेपासून खासदार पदापर्यंत त्यांचा स

रमाबाई रानडे...

मी आहे, रमा....हो, खर्रेच...। तुमचीच रमा म्हणजेच रमाबाई रानडे...यांची भूमिका करणारी "तेजश्री वालावलकर"आमच्या असंख्य अभ्यागतांनी आग्रह केल्यामुळे रमाबाई रानडे यांच्या संबंधी एक लिंक इथे...।रमाबाई रानडे लिखित- आमच्या आयुष्यातील काही आठवणींची...नेटवर शोधुन शोधुन थकलो आणि ही लिंक सापडली- http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=190612112607&PreviewType=ebooks (या लिंकरुपी ईपुस्तक उपलब्ध करून देणार्‍यांचेही शतशः आभार आणि धन्यवाद).