मुख्य सामग्रीवर वगळा

गणपतीपुळे, तारकर्ली किनार्‍यांवर जीवरक्षक उपक्रम लवकरच

मुंबई, - मुंबईसह राज्याच्या समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याला शासनाचे नेहमीच प्राधान्य असून गणपतीपुळे व तारकर्ली किनार्‍यांवर जीवरक्षक उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचा विचार निश्चितपणे केला जाईल. असे राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलिया येथील शुअर लाइफ सेव्हिंग या संस्थेचे प्रमुख श्री. नॉर्मन फार्मर यांच्यासह राष्ट्रीय लाइफ सेव्हिंग सोसायटीचे प्रमुख पी. डी. शर्मा, युवराज चंदेशा आणि जूहू येथील सी गार्डियन लाइफगार्ड या संस्थेचे सुनिल कनोजिया यांनी भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी श्री. भुजबळ बोलत होते.
अशासकीय संस्था (एनजीओ) असलेल्या या संस्थांनी संयुक्तपणे राज्याच्या समुद्रकिनार्‍यांवर लाइफगार्ड सुविधा उपलब्ध करण्याचा आपला मानस असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले. जुहू येथील सी गार्डियन लाइफगार्ड संस्थेतर्फे कोणत्याही आर्थिक लाभाशिवाय लाइफ-सेव्हिंग उपक्रम व्यवस्थितरित्या चालविण्यात येत असल्याची माहितीही त्यांना देण्यात आली.
ते म्हणाले, की समुद्रकिनार्‍यांवर लाइफसेव्हिंग सुविधा आम्हाला विकसित करावयाचीच आहे. त्यादृष्टीने या संस्थांच्या प्रतिनिधींनी आमच्या गणपतीपुळे आणि तारकर्ली किनार्‍यांची पाहणी करावी. तेथे कोणकोणत्या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत, कोणती साधने आपल्याला लागतील, कोणत्या सुविधा विकसित करण्यात येतील, किनारे स्वच्छ व सुंदर ठेवण्याबरोबरच त्यांची निगा कशी राखणार, लागणारा निधी व त्याचा विनियोग यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव सादर करण्याची सूचना भुजबळ यांनी केली. तसेच स्थानिक नागरिकांनाच लाइफ सेव्हर म्हणून प्रशिक्षित करून आपल्या कामात सहभागी करण्याची सूचनाही केली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर उपस्थित होते



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012