एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, ७ मार्च, २०११

एलिफंटा महोत्सवास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, ता. ६ - महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एलिफंटा महोत्सव-२०११ ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे पर्टटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
ऐतिहासिक घारापुरी बेटांवर दोन दिवस चालणार्‍या या महोत्सवाचे उदघाटन श्री. भुजबळ यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. आमदार पंकज भुजबळ, निवृत्त न्यायाधीश राधाकृष्णन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे उपस्थित होते.
राज्याच्या सांस्कृतिक वैभवात भर पडण्याच्या दृष्टीने पर्यटनास प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने असे आयोजन निश्चितच महत्त्वपूर्ण ठरते, यात खंड पडू न देण्याची दक्षता घेतली पाहिजे असे मत यावेळी श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या महोत्सवात डॉ. राजा आणि राधा रेड्डी यांच्या कुचीपुडी नृत्याने वातावरणात गहिरे रंग भरले तर पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. महोत्सवाच्या दुसर्‍या (शेवटच्या) दिवशी गीता चंद्रन यांचे भरतनाट्यम् आणि देवकी पंडित यांच्या गायनाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, महोत्सवासाठी गेट वे ऑफ इंडिया तसेच घारापुरी येथून विशेष लाँचची व्यवस्था करण्यात आली होती.