मुख्य सामग्रीवर वगळा

रंग-पंच-मी...



देशात साजरे केल्या जाणाऱ्या विविध सण-वार, उत्सव, महोत्सवांचे स्वरूप गेल्या दशकात बदलत आहे. वर्षानुवर्ष असलेली बंधने आता बंधनातून मुक्त होऊन स्वच्छंदी विहार करत आहेत. मर्यादा सुद्धा अमर्यादपणे अथांग वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहापणे वहात आहेत हे चित्र तर गेल्या पाच वर्षात स्पष्ट झालेच आहे. परिणामी महिला देखील पुरुषांप्रमाणेच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी घराबाहेर पडल्या आहेत. स्त्री-पुरुष भेद हे अंतर बव्हंशी कमी झाले असून कामानिमित्त महिला देखील अहोरात्र पुरुषांप्रमाणेच रस्त्याने येताजाताना दिसत आहेत. इतकेच नव्हे, तर आजकालच्या नवीन ट्रेंडनुसार होळी, धूळवड, रंगपंचमी अशा सणवार, उत्सवांना मोठ्या संख्येने महिला सुद्धा मित्र-मैत्रीणींकडे धूळवड, रंग खेळण्यासाठी थाटामाटात जाताना दिसतात. परंतु विविध रंगांनी रंगलेले चेहरे धुण्यासाठी मात्र बरीच मेहनत घ्यावी लागते. रंग तयार करताना करण्यात आलेले रसायनाचे मिश्रण किंवा अबीराऐवजी पेन्ट्स चा वाढलेला वापर हे याचे कारण आहे. रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालकांवर, पादचाऱ्यांवर सर्रासपणे पाण्याने भरलेले, रंगांनी भरलेले फुगे फेकल्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होणे, या घटना सुद्धा वाढल्या आहेत. एकमेकांना रंग लावताना अर्थातच रंग पंच करताना, रंगाने भरलेले फुगे पथिकांवर फेकताना पुरेशी काळजी घेऊन जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी, हीच अपेक्षा. मात्र रंगांची उधळण कमी न करता नैसर्गिक रंगांची नवरंगी उधळण करून जल्लोषात सर्व गोष्टी घडतील हाच विश्वास...!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012