एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, २० मार्च, २०११

धूळवडीला विजयी होण्याचे वेस्ट इंडीज् चे स्वप्न धुळीत...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आक्रमक खेळी न खेळल्यामुळे तोंडाशी आलेला विजय न झाल्यामुळे सगळीकडूनच रोष ओढावलेल्या भारतीय संघाने आज सुटकेचा निश्वास सोडला. होळी आणि धूळवडीनिमित्त संघाने वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या आजच्या सामन्यात इंडीजच्या संघाला चांगलीच धूळ चारून विजयी होण्याचे इंडीज संघाचे स्वप्न अक्षरशः धुळीत मिळवले.
नाणेफेक जिंकून प्रथम खेळण्याचा संघाचा निर्णय निर्णायक ठरला. मध्यंतरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या सामन्यात अत्यंत ढिसाळ खेळी आणि फलंदाजी करून आफ्रिकेला सहज विजय मिळवून दिल्याबद्दल संघाविरुद्ध सगळीकडेच रोष होता. तर संघाच्या वरिष्ठांनी संघावर ताशेरे ओढून संघाला सक्त ताकीद दिली होती. याचा चांगलाच परिणाम झाल्याचे आज चेन्नई येथे झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडीजच्या एक दिवसीय सामन्यात जाणवले. सचिनचे शतकांचे शतक आजच्या सामन्यात पूर्ण होण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. काही वेळातच तंबूत परतणाऱ्या सचीनच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट जाणवत होती. आजच्या यशाचा मानकरी ठरलेल्या युवराज सिंह याची कामगिरी खरोखरच प्रशंसनीय होती. संघात नव्यानेच सामील झालेल्या अश्विनी याची कामगिरी देखील लक्षात घेण्यासारखी ठरली. आजच्या विजयामुळे भारताने9 गूण प्राप्त करून दुसरे स्थान टिकवण्यात यश मिळवले असेच म्हणावे लागेल. येत्या गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारताकडून अपेक्षा उंचावल्या असून नाणेफेक जिंकल्यास, धावांचा मोठा डोंगर मात्र आव्हानात्मकरित्या उभा करावा लागणार आहे, हे मात्र निश्चित!