मुख्य सामग्रीवर वगळा

ऍम्युझमेंट क्षेत्रातील कंपन्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज: भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. १५ - ऍम्युझमेंट क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजक कंपन्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केले. इंडियन असोसिएशन ऑफ ऍम्युझमेंट पार्क्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने गोरेगाव (पूर्व) येथे आयोजित अकराव्या "ऍम्युझमेंट एक्स्पो" या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी श्री. भुजबळ बोलत होते.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, तंत्रज्ञान जितक्या गतीने विकसित होते तितक्याच गतीने ऍम्युझमेंट (मनोरंजन) उद्योगांनी या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या विविध उपक्रमात सुद्धा सातत्याने नाविन्यपूर्णता आणि अभिनवता आणण्याची गरज असते. तसे झाले तरच एकदा येणारा पर्यटक, ग्राहक पुन्हा तिथे येईल. तसेच नवीन ग्राहकांची देखील भर पडेल. ग्राहकांची सुरक्षितता जपण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान अवलंबिण्याची गरज आहे.
सुमारे पाच हजार कोटिंचा ऍम्युझमेंट उद्योगाच्या आशिया-पॅसिफिक विभागातील वृद्धीचा दर ५.५ टक्के प्रतिवर्ष इतका आहे. तोच युरोपसह अन्यत्र ५ टक्के आहे. म्हणूनच अनेक परकीय गुंतवणुकदार कंपन्या भारतात या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. देशात महानगरांसह छोट्या-छोट्या खेड्यांमधील नागरिकांचा ओढाही ऍम्युझमेंट पार्ककडे वाढू लागला आहे. त्यांना आवश्यक त्या मनोरंजन सुविधा उपलब्ध करण्यासाठी देशातील व परकीय उद्योजकांनी गुंतवणुक करण्याची गरजही भुजबळ यांनी प्रतिपादित केली.
कार्यक्रमास एयएएपीएय चे संस्थापक सदस्य अशोक गोयल, अरुणकुमार मुच्छला, बलवंत चावला, एमजीएम आनंद, राजन शाह, ट्रेड शो समितीचे चेअरमन अजय सरीन आदी मान्यवर आणि देशातील उद्योजकांसह १४ देशांमधील उद्योजक उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012