मुख्य सामग्रीवर वगळा

यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचे हित जपणारा - भुजबळ

 मुंबई ता. २५ - केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
कोणतीही भाडेवाढ नसलेला, ज्येष्ठ नागरिक, अपंगांना भाड्यात सवलत देणारा, युवकांचा विशेष विचार करणारा त्याचप्रमाणे गरीबांना 'इज्जत तिकीटाच्या' माध्यमातून सन्मान प्राप्त करून देणारा हा अर्थसंकल्प आहे. रेल्वेने दुर्गम भाग जोडण्याची घोषणा, दहा हजार लोकांसाठी घरे बांधण्याचा संकल्प आणि हमालांना ट्रॉली उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळेही या अर्थसंकल्पाचा सामाजिक पाया विस्तारला आहे.
महाराष्ट्राचीही या अर्थसंकल्पाने उत्तम दखल घेतली असल्याचे सांगून भुजबळ म्हणाले की, मनमान-मुंबई, पुणे-नांदेड मार्गे लातुर, लातूर-पुणे, वसई रोड-पनवेल, चेन्नई-शिर्डी मार्गे बंगळूर, मुंबई-अलाहाबाद, नागपूर-मुंबई दुरांतो दररोज, मुंबई-नवी दिल्ली, हावडा-नांदेड, भुज-दादर अशा अनेक नवीन रेल्वेसेवांसह नव्या पॅसेंजर गाड्यांमुळेही महाराष्ट्रातील जनतेचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. कोल्हापुर, कोकण रेल्वेशी जोडण्याच्या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्राशी कोकण जोडण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. मुंबईसाठी ४२ नवीन गाड्या, सर्व लोकल ट्रेन १२ डब्यांच्या करण्याची घोषणा देखील मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. नंदीग्राममध्ये रेल्वेसाठी औद्योगिक पार्क आणि महाराष्ट्रात ७०० मेगावॅटचा वायू आधारित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. तथापि, पायाभूत सुविधा निर्मिती आणि कारखाने यांच्या सक्षमीकरणाकडे अधिक लक्ष दिले गेले असते तर हा अर्थसंकल्प परिपूर्ण झाला असता, असे मतही श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012