मुख्य सामग्रीवर वगळा

'एमटीडीसी' तर्फे शनिवारी घारापुरी बेटावर स्वच्छता मोहिम

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २४ - येथून जवळच असलेल्या जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा केव्हज् असलेल्या घारापुरी बेटावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातपर्फे मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने शनिवारी (ता. २६ फेब्रुवारी) स्वच्छता व जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे.
एलिफंटा केव्हज् (गुहा)नां देशासह विदेशातील पर्यटक देखील मोठ्या संख्येने भेट देतात. परिणामी परिसरात प्लॅस्टिकचा कचरा विखुरलेला असून हा कचरा लाटांमुळे बेटावर जाऊन अडकतो. या कचर्‍यामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सुमारे १०० स्वयंसेवकांसह महामंडळ, वनविभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत घारापुरी यांचाही मोहिमेत मोठा सहभाग असेल. स्वच्छतेनंतर प्रबोधन करण्यात येईल. गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे येणार्‍या बोटींमध्येही स्वच्छताविषयी फलक लावण्यात येणार आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012