मुख्य सामग्रीवर वगळा

"महामानव डॉ. आंबेडकर" पुस्तकाचे भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ता. २३ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाची गुजराती भाषिकांना अत्यंत ओघवत्या व सोप्या भाषेत ओळख करून देण्यामध्ये हेमराज शाह यांचे "महामानव डॉ. आंबेडकर" हे पुस्तक निश्चितपणे यशस्वी ठरेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत आंबेडकरांच्या लेखन व भाषणांचे २१ खंड प्रकाशित करून अद्यापही काही खंड प्रकाशित होतील, इतकी विपुल साहित्यसंपदा आंबेडकरांची आहे. तथापि, त्यांचे समग्र कार्य, विचार छायाचित्रांसह केवळ १३४ पानांमध्ये अत्यंत कुशलतेने शब्दबद्ध केले आहे. याबद्दल श्री. भुजबळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. हेमराज शाह हे मराठी आणि गुजराती भाषेस जोडणारा एक दुवा म्हणून अतिशय प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी, वसंतदादा पाटील, शरद पवार आदींविषयी त्यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक ग्रंथांच्या माध्यमातून त्यांची चरित्रलेखनावरील जबरदस्त पकड आणि अभ्यास यांची प्रचिती येते. श्री. शाह गेली १५ वर्षे सातत्याने गुजराती वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन करीत आहेत, ही बाबही सोपी नसल्याचे श्री. भुजबळ म्हणाले. यावेळी उदय शाह, अरविंद शाह, अशोक शाह, प्रशांत झवेरी आदी मान्यवर उपस्थित होते

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012