मुख्य सामग्रीवर वगळा

'डेक्कन ओडिसी' चे लवकरच पुनरुज्जीवन: एमटीडीसी बैठकीत निर्णय

मुंबई, ता. २२ - महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राचे वैभव असलेल्या 'डेक्कन ओडिसी' या लक्झरी ट्रेनचे उत्तम पद्धतीने लवकरच पुनरुज्जीवन करून राज्यांतर्गत तिच्या अधिकाधीक सहली आयोजित करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचा निर्णय आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) बैठकीत घेण्यात आला. हॉलेज आकारात कपात करण्यासाठी केंद्र शासनाकडे वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचा ठरावही करण्यात आला.
राज्याचे पर्यटनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष छगन भुजबळ अध्यक्षस्थानी होते. बैठकीस पर्यटन राज्यमंत्री व महामंडळाचे उपाध्यक्ष रणजीत कांबळे, पर्यटन विभागाचे सचिव आनंद कुलकर्णी, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर तसेच महामंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात इको-टुरिझमचा विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महाराष्ट्र वनविकास महामंडळासमवेत सामंजस्य करार केला आहेय यानुसार संरक्षित वनहद्दीच्या बाहेर एमटीडीसीच्या माध्यमातून पर्यटक निवासासह अन्य आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. संरक्षित वनहद्दीमध्ये वनविकास महामंडळातर्फे पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
राज्यातील पर्यटनाची प्रसिद्धी, प्रचार आणि प्रसार यासाठी देशात व परदेशात भरविण्यात येणार्‍या विविध पर्यटनविषयक शिबिरे तसेच प्रदर्शनांमध्ये सहभागी होऊन राज्यातील पर्यटनविषयक संधी अधिकाधिक पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला. राज्यातील सागरी किनार्‍यांचा पर्यटन विकास करण्यासाठी तसेच त्याठिकाणी पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्णय यावेळी पर्यटनमंत्र्यांनी दिले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012