मुख्य सामग्रीवर वगळा

इटलीचा विवियानी इलिया आंतरराष्ट्रीय रेसमध्ये; कर्नाटकचा साबू गांगर राष्ट्रीय स्पर्धेत विजेते

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
नाशिक (वार्ताहर) - नाशिक फेस्टिव्हल निमित्ताने भुजबळ फाऊंडेशन आणि आयडी स्पोर्ट्स आयोजित आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा शुक्रवारी नाशिकमध्ये उत्साहात संपन्न झाली. इटलीच्या 'लिकवी गॅस' टीमचा विवियानी इलिया तर राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटकचा साबू गांगर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना अनुक्रमे सहा हजार युरो आणि सव्वालाख रुपयांचे बक्षीस राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकचे खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
स्वीस येथील इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन, द युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल आणि इंडियाज सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी भारतात 'टूर द मुंबई' ही नाशिक आणि मुंबई येथे दोन टप्प्यात सायक्लॉथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचा दुसरा टप्पा रविवारी मुंबईत संपन्न झाला. नाशिकच्या स्पर्धेत सुमारे पाच हजार दोनशे सायकलस्वारांनी सहभाग घेतला. यात १०८ आंतरराष्ट्रीय, ६८ राष्ट्रीय स्पर्धक होते. उर्वरित स्पर्धकांमध्ये नाशिक शहरातील आम नागरीक, तरुण तरुणी आदींचा समावेश होता. सुमारे २५ हजार नाशिककरांनी विविध रेस पाहिल्या. आंतरराष्ट्रीय स्पर्धकांची मुख्य रेसपुर्वी सेरेमोनियल राईड झाली. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील जिंजर हॉटेलपासून ही राईड निघाली.
दरवर्षी फ्रान्समध्ये आयोजित केल्या जाणार्‍या टूर द फ्रान्स या स्पर्धेप्रमाणेच भारतात आयडी स्पोर्ट्सतर्फे टुर द मुंबई ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा गेल्या वर्षापासून घेत असल्याचे स्पोर्ट्स चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अकील खान यांनी सांगितले. दरवर्षी स्पर्धेत नवनवीन शहरे वाढविली जातील असेही ते म्हणाले.
संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग मुळे प्रदूषणाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्याचा मुख्य उपाय म्हणजे इंधनाचा कमी वापर करणे, यामुळेच 'बर्न फॅट्स, नॉट फ्यूएल' हे घोषवाक्य बनवून भुजबळ फाऊंडेशनने सायकलिंगचा प्रचार प्रसार करण्यासाठी 'चरबी जाळा, इंधन वाचवा' हा पर्यावरण रक्षणाचा संदेश सायकल स्पर्धेद्वारे दिल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
स्पर्धेत अमेरिकेच्या रॅडिओशॅक चा मॅकवेन रॉबी याला द्वितीय तर दक्षिण आफ्रिकेच्या टीम बोनीटास चा डे टायटलर याला तृतीय क्रमांक मिळाला. यांना अनुक्रमे तीन हजार, दीड हजार युरो चा धनादेश देण्यात आला. राष्ट्रीय स्पर्धेत ६३ किमी च्या राईडमध्ये कर्नाटकचा साबू गांगर यांना सव्वा लाखाचे प्रथम बक्षीस तर दिल्लीच्या सचिन कुमार यांना ८५ हजाराचे तर कर्नाटकच्या श्रीधर सावनूर यांना ६५ हजाराचे बक्षीस देण्यात आले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012