मुख्य सामग्रीवर वगळा

आई, तू रडू नकोस...

"प्लास्टिक ऍनिमिया" झालेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकल्या कृष्णाचे हे बोल आहेत...त्याला झालेल्या असाध्य रोगामुळे आणि डॉक्टरांनी त्याला आता अवघ्या एका महिन्याची मुदत दिल्यामुळे दिवसभर रडणार्‍या आणि आसुसलेल्या डोळ्यांनी आपल्या पिटुकल्याला डोळे भरून पाहणार्‍या आईला कृष्णा सारखा समजावत असतो.
आपण वाचणार नाही याची जाणीव असलेला सहा वर्षांचा कृष्णा हा चिमुरडा मात्र बिनधास्त आहे. कृष्णाच्या शरीरात नवीन रक्त तयार होणे जवळजवळ बंद झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. त्याचे गरीब आई-वडील पैशाअभावी त्याच्यावर औषधोपचार करण्यात असमर्थ ठरले आहेत. इंदूरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये कृष्णावर उपचार सुरू आहेत. चार महिन्यातून सहा वेळा त्याला "ओ पॉझिटीव्ह" रक्त देण्यात आले आहे. डॉक्टरांनी कृष्णाच्या आई-वडिलांना बोनमॅरो ट्रान्सप्लँटेशनचा आणखी एक सल्ला दिला आहे. परंतू यासाठी, त्यांच्याजवळ नसलेल्या आणि इतके जमवणे शक्य नसलेल्या १५ लाख रुपयांची गरज आहे. कृष्णाचे वडील आरएस कुशवाह मजूर असून त्यांच्या डोक्यावर अगोदरचाच सुमारे दीड लाख रुपयांचे अक्षरशः ओझे आहे. कृष्णाची बहिण नंदिनी कृष्णासाठी देवापुढे दररोज याचना करत असून कोणाकडूनही काही मदत मिळवण्यासाठी धडपडत आहे...त्याला मदत करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी सुद्धा पुढे सरसावले आहेत. कृष्णा याला मदत करण्यासाठी मोबाईल क्रमांक ९९२६५२७४९९ येथे संपर्क साधण्याची विनंती त्याच्या पालकांनी केली आहे.
कृष्णा हे सगळे शांतपणे पहात आहे...कदाचित आपल्याला लोकांनी मदत केली नाही तरी, काळ आपल्याला आपल्या कुशीत सामावून घेईल याची जाणीव या चिमुरड्याला झाली असावी..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012