मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देशाच्या सर्वंकष विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प: अजित पवार

मुंबई, ता. २८ - केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सादर केलेल्या २०११-१२ च्या अर्थसंकल्पामुळे देशाच्या सर्वंकष विकासाला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केली. श्री. पवार म्हणाले की, राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठीच्या भरीव तरतुदीबरोबरच डाळी, भाजीपाला, बाजरी, ज्वारीच्या उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठीचे प्रयत्न म्हणजे खर्‍या अर्थाने दुसर्‍या हरितक्रांतीच्या दिशेने टाकलेली दमदार पावले आहेत. कृषी पतपुरवठ्यातील एक लाख कोटी रुपयांची भरीव वाढ तसेच मांस, मासे, दूध आदींच्या उत्पादन आणि वितरणात सुलभतेसाठी आखलेल्या योजना शेतीपूरक व्यवसायाला चालना देणार्‍या आहेत. त्याचबरोबर महिला बचत गटांसाठी केलेल्या तरतुदीमुळे ग्रामीण भागाच्या सर्वंकष उन्नतीस हातभार लागेल . अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, की सध्या अस्तित्वात असलेल्या विशाल किंवा अतिविशाल ऊर्जा प्रकल्पांना भांडवली वस्तूचा पुरवठा करणार्‍या डोमेस्टिक सप्लायर्सनां पॅरलल एक्साईज ड्यूटीतून सवलत मिळणार आहे. तसेच पीपीपी अंत

छगन भुजबळ यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत

मुंबई, ता. २८ - महागाई नियंत्रणाबरोबरच अन्नधान्य उत्पादन वाढीला चालना देणारा तसेच कृषी क्षेत्राबरोबरच औद्योगिक दर वृद्धीचे सूतोवाच करणारा अर्थसंकल्प 'आम आदमी' ला दिलासा देणारा तसेच परिपूर्ण ठरला आहे. या शब्दात सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी, केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केलेल्या सन २०११-१२ च्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. शेती, शिक्षण या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करत असतानाच जीवनावश्यक वस्तू, इंधनाच्या किंमती नियंत्रणात राहण्यासाठी त्यावर कोणताही कर न लावता आणि प्राप्तीकरमर्यादा वाढवून नोकरदार वर्गालाही दिलासा देणार्‍या या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे, असे मत श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, कृषी क्षेत्राने ५.४ टक्क्यांची वृद्धी नोंदविली ही अत्यंत चांगली बाब आहे. ही वाटचाल आगामी वर्षातही कायम रहावी यासाठी अर्थसंकल्पात विचार केला आहे. भाजीपाला, डाळींच्या उत्पादनासाठी भरीव आर्थिक तरतूद, कृषी कर्जमर्यादा ४.७५ लाखांवर, खतांवर रोख सबसिडी, सिंचन उपकरणे व कृषी अवजार स्वस्त, कोल्ड स्टोअरेज प्

कोकणच्या विकासाला सर्वतोपरी सहाय्य करणार: भुजबळ

  मुंबई, ता. २५ - पर्यटकांना इतर राज्यातील पर्यटन स्थळांचा विसर पडेल इतकी पर्यटन क्षमता कोकणात आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाच्या विकासाकरिता राज्य शासनातर्फे सवर्तोपरी सहाय्य करण्यात येईल. असे आश्वासन राज्याचे पर्यटनमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने बांद्रा-कुर्ला संकुलातील मैदानावर आयोजित ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त चर्चासत्रात श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी पर्यटनमंत्री असताना कोकणसाठी केलेल्या प्रयत्नांना तेव्हाच्या मानसिकतेमुळे अनुकूल वातावरण नव्हते, परंतू आजच्या या ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सवातून मात्र कोकणवासीयांची पर्यटनाबाबतची मानसिकता अनुकूल झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्र किंवा कोकणात येणारा विदेशी पर्यटक सुमारे ८० जणांना रोजगार उपलब्ध करून देतो. कोकणातील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्ग व त्यावरील पुलांची बांधकामे प्रगतीपथावर असून लवकरच पूर्णत्वास येत आहेत. रायगड सारख्या ऐतिहासिक किल्ल्याचा व परिसराच्या विकासासाठी खर्च करण्याची राज्य शासनाची तय

किती उरली आहे अस्खलित मराठी...?

  दिवसेंदिवस जग जवळ येतंय, तसा माणूस माणसापासून दूर जातोय. टीव्ही, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, इंटरनेट, कॉम्प्यूटर अशा विविध माध्यमांमुळे होणारी प्रगती आणि विकास नाकारता येणार नाही. परंतू माणूस माणसापासून दूर जातोय हे कटूसत्य आहे. काही वर्षांपूर्वी मातृभाषेसह एखादी भाषा बोलता येणारी व्यक्ती आता किमान चार भाषा बोलू लागली आहे. मात्र भोवतालच्या वातावरणामुळे बऱ्याच अंशी कित्येकांच्या, विशेषतः मराठी बांधवांच्या भाषेवर विपरित परिणाम झाला आहे. अन्य मातृभाषा असलेले परंतू महाराष्ट्रात राहणारे बांधव एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेतच साधतात. आमचा मराठी बांधव मात्र एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेत बोलण्याऐवजी अन्य भाषेत बोलतो. मध्य प्रदेशाकाही राज्यांमध्ये तर सर्रासपणे हे पहावयास मिळते. आजी-आजोबा मराठी बोलतात, आई-वडिल मराठी-हिंदी भाषेत बोलतात आणि तिसरी पिढी म्हणजेच मुलं..या मुलांना तर मराठी अगदी कमी बोलता येतं..! त्यांचे पालक देखील त्यांच्याशी जास्तीत जास्त हिंदीमध्येच बोलतात. हिंदी भाषेचा येथे विरोध नाही, मात्र आपली मातृभाषा विसरता कामा नये, मातृभाषा यायलाच पाहिजे हे संस्कार आपल्या मुलांवर कर

CIDCO organizes Vasant Mela at Urban Haat

  The Urban Haat at Navi Mumbai has surfaced as the new happening destination for the exhibition and sale of artifacts of artisans from various states. Last year, the citizens of Navi Mumbai bought the artifacts from various states displayed at different exhibitions at Urban Haat and also experienced a great time. The exhibitions included CIDCO Navi Mumbai Festival, Kokan Saras, Maharashtra Mahotsav, Handloom Festival, Marathi Vyapari Mitramandal Mahotsav, Vasant Mela, Shravan Mela and Surabhi Dhamaka. Now, Vasant Mela is being organized at Urban Haat from 9th to 20th March, 2011. With an objective to benefit the artists displaying their traditional folk art at the Urban Haat as well as the citizens, CIDCO aims to organize such exhibitions for the whole year at Urban Haat. Through this appeal, Bachat Gats from all Zilla Parishads under Rural Development Department, Maharashtra, artisans related to Khadi Gramodyog Mandal as well as handloom, handicraft and food artists, sculptors

सर्वसामान्यांना दिलासा देणारा रेल्वे अर्थसंकल्प- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, ता. २५ - रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ नाही, तसेच मुंबईसह राज्यातील विविध शहरे एकमेकांशी जोडणार्‍या नव्या रेल्वेगाड्यांच्या घोषणेमुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्ते केली आहे. श्री. पवार यांनी म्हटले आहे की, नागपूर-कोल्हापूर, पुणे-नांदेड, नागपूर-भुसावळ, मुंबई-सावंतवाडी रोड आणि मुंबई-मनमाड या नव्या गाड्यांच्या घोषणेमुळे राज्यातील महत्वाच्या शहरांमधील दळणवळण वाढणार आहे. राज्याच्या सर्वंकष विकासासाठी ही बाब महत्वाची ठरेल. देशातील प्रमुख महानगरांसाठी केलेली एकात्मिक उपनगरीय रेल्वे नटेवर्क प्रकल्पाची घोषणा मुंबईच्या दृष्टीनेही महत्वाची ठरणार आहे. त्यातून मुंबईतील उपनगरीय सेवा तसेच मेट्रो आणि रेल्वेशी संबंधित इतर बाबींचा कार्यक्षमपणे आणि गतीने विकास होईल. त्याचबरोबर उपनगरीय रेल्वेच्या ४७ नव्या फेऱ्या वाढणार असल्याने मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होण्यास मदत होईल. विशेषतः ठाणे बेलापूर पट्ट्यातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाणे-वाशी मार्गावरील वाढीव फेर्‍यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठ

यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचे हित जपणारा - भुजबळ

 मुंबई ता. २५ - केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. कोणतीही भाडेवाढ नसलेला, ज्येष्ठ नागरिक, अपंगांना भाड्यात सवलत देणारा, युवकांचा विशेष विचार करणारा त्याचप्रमाणे गरीबांना 'इज्जत तिकीटाच्या' माध्यमातून सन्मान प्राप्त करून देणारा हा अर्थसंकल्प आहे. रेल्वेने दुर्गम भाग जोडण्याची घोषणा, दहा हजार लोकांसाठी घरे बांधण्याचा संकल्प आणि हमालांना ट्रॉली उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळेही या अर्थसंकल्पाचा सामाजिक पाया विस्तारला आहे. महाराष्ट्राचीही या अर्थसंकल्पाने उत्तम दखल घेतली असल्याचे सांगून भुजबळ म्हणाले की, मनमान-मुंबई, पुणे-नांदेड मार्गे लातुर, लातूर-पुणे, वसई रोड-पनवेल, चेन्नई-शिर्डी मार्गे बंगळूर, मुंबई-अलाहाबाद, नागपूर-मुंबई दुरांतो दररोज, मुंबई-नवी दिल्ली, हावडा-नांदेड, भुज-दादर अशा अनेक नवीन रेल्वेसेवांसह नव्या पॅसेंजर गाड्यांमुळेही महाराष्ट्रातील जनतेचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. कोल्हापुर, कोकण रेल्वेशी जोडण्याच्या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्

रेल्वे बजेट २०११...ठळक मुद्दे...! ५७.६३० कोटिंचे बजेट..

ममता बॅनर्जी सादर करीत असलेले रेल्वे बजेट २०११ ऐकताना माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी सादर करीत असलेल्या ५७.६३० कोटिंच्या रेल्वे बजेट २०११ चे ठळक मुद्दे...:- * आम-आदमी अर्थात सामान्य माणसाला लक्षात घेऊन बजेट... * सिंगूर येथे मेट्रो कोच फॅक्टरी * रायबरेली कारखान्यातून पहिला कोच तीन महिन्यात * अनेक गाड्यांची कोच साठी मागणी, नवीन कोच फॅक्टरींचा प्रस्ताव * जम्मू काश्मिरमध्ये ब्रिज फॅक्टरी * रेल्वे नेटवर्कला इम्फाळ जोडणार * १८० किलोमीटरचा नवीन लोहमार्ग * ८५ नवीन सार्वजनिक-खाजगी प्रकल्प * नंदीग्राममध्ये इंडस्ट्रियल पार्क * रेल-रोको आंदोलने थांबविण्याचे प्रत्येकास आवाहन * रेल्वे मार्गाजवळ राहणार्‍या बेघरांसाठी १०,००० निवारे * रेल्वे अपघातांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या २९ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आले. *  ऑनलाइन बुकिंग स्वस्त होणार * पायलट प्रोजेक्ट्समध्ये स्मार्ट कार्ड वापरले जाणार * रेल्वेचे कर्मचारी हीच रेल्वेची मोठी संपत्ती

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

आंबोली घाटातील वनविभागाच्या हद्दीतील संरक्षक भिंतीचे काम तातडीने मार्गी लावावे-भुजबळ

  मुंबई, ता. २४ - आंबोली घाटात वनविभागाच्या हद्दीतील संरक्षक भिंत बांधण्याचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे. वनविभागास आवश्यक ते तांत्रिक सहकार्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी करावे अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. आंबोली वनविभागाच्या हद्दीतील कामांबाबत आयोजित बैठकीत श्री. भुजबळ बोलत होते. बैठकीस आमदार दीपक केसरकर, सा.बां.विभागाचे सचिव धनंजय धवड, वनविभाग सहसचिव प्रदीप कुमार आदी उपस्थित होते. गतवर्षी जुलैमध्ये झालेल्या पावसाने आंबोली घाटातील १०० मीटर लांबीची आणि  ४० मीटरपेक्षाही उंचीची दरड कोसळली होती. युद्धपातळीवर काम करून येथील वाहतूक सुरळीत करावी लागली होती. संरक्षक भिंत बांधण्याचे काम वेळेतच पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात पुन्हा एखादी मोठी दरड कोसळून जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवश्यक ते सर्व सहाय्य घेण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले आहेत.

'एमटीडीसी' तर्फे शनिवारी घारापुरी बेटावर स्वच्छता मोहिम

  मुंबई, ता. २४ - येथून जवळच असलेल्या जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा केव्हज् असलेल्या घारापुरी बेटावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातपर्फे मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने शनिवारी (ता. २६ फेब्रुवारी) स्वच्छता व जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे. एलिफंटा केव्हज् (गुहा)नां देशासह विदेशातील पर्यटक देखील मोठ्या संख्येने भेट देतात. परिणामी परिसरात प्लॅस्टिकचा कचरा विखुरलेला असून हा कचरा लाटांमुळे बेटावर जाऊन अडकतो. या कचर्‍यामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सुमारे १०० स्वयंसेवकांसह महामंडळ, वनविभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत घारापुरी यांचाही मोहिमेत मोठा सहभाग असेल. स्वच्छतेनंतर प्रबोधन करण्यात येईल. गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे येणार्‍या बोटींमध्येही स्वच्छताविषयी फलक लावण्यात येणार आहेत.

'डेक्कन-ओडिसी' तून ७५ परदेशी पर्यटकांनी घेतले महाराष्ट्र दर्शन

मुंबई, ता. २४ - महाराष्ट्राची लक्झरी ट्रेन 'डेक्कन-ओडिसी' ने बर्‍याच कालावधीनंतर नियमित सहलमार्गावर धाव घेतली. दिनांक १६ ते २३ फेब्रुवारी २०११ या कालावधीत या गाडीतून सुमारे ७५ परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राची सफर घडविली असल्याची माहिती आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) देण्यात आली. 'डेक्कन-ओडिसी' मुंबई, सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, गोवा येथील प्रसिद्ध गिरजाघरे, समुद्रकिनारे, कोल्हापूर येथील शालिनी पॅलेस, न्यू पॅलेस, जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला, ताडोबा अभयारण्य, नाशिक येथील गोदावरी घाट आणि प्रसिद्ध मंदिरे इ. ठिकाणांना पर्यटकांनी भेट दिली. सहलीदरम्यान पर्यटकांचे ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककलांचे दर्शन घेडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या हंगामात डेक्कन ओडिसीच्या ८ सहली करण्याचा प्रयत्न होता, तथापि पर्यटकांच्या अल्प प्रतिसादामुळे नोव्हेंबर व फेब्रुवारीमध्ये प्रत्येकी एका सहलीचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वेची अवास्तव हॉलेजची मागणी, सहलीच्या महसूलातील वा

कोल्हापूरच्या पाणीपुरवठा योजनेस तत्वतः मान्यता

  मुंबई, ता. २३ - कोल्हापूर शहरासाठीची थेट पाणीपुरवठा योजना आणि महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या प्रस्तावास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वतः मान्यता दिली. शहरातील विविध कामांबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. कोल्हापूर शहरासाठीच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री म्हणाले, की योजनेचा आर्थिक बोजा, भविष्यातील देखभाल दुरुस्ती व काम करण्याची सुलभता यांचा तौलनिक अभ्यास करून योग्य योजना राबवावी. कोल्हापूर महानगरपालिकेकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे याचाही विचार व्हावा. ही थकबाकी असतानाही आम्ही नव्या योजनेसाठी विशेष बाब म्हणून निधी देत आहोत. ही योजना योग्यरित्या राबविली आणि चालविली गेली पाहिजे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्वांनीच एकत्र आले पाहिजे. ही योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी पालकमंत्री, महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक

"महामानव डॉ. आंबेडकर" पुस्तकाचे भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ता. २३ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाची गुजराती भाषिकांना अत्यंत ओघवत्या व सोप्या भाषेत ओळख करून देण्यामध्ये हेमराज शाह यांचे "महामानव डॉ. आंबेडकर" हे पुस्तक निश्चितपणे यशस्वी ठरेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत आंबेडकरांच्या लेखन व भाषणांचे २१ खंड प्रकाशित करून अद्यापही काही खंड प्रकाशित होतील, इतकी विपुल साहित्यसंपदा आंबेडकरांची आहे. तथापि, त्यांचे समग्र कार्य, विचार छायाचित्रांसह केवळ १३४ पानांमध्ये अत्यंत कुशलतेने शब्दबद्ध केले आहे. याबद्दल श्री. भुजबळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. हेमराज शाह हे मराठी आणि गुजराती भाषेस जोडणारा एक दुवा म्हणून अतिशय प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी, वसंतदादा पाटील, शरद पवार आदींविषयी त्यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक ग्रंथांच्या माध्यमातून त्यांची चरित्रलेखनावरील जबरदस्त पकड आणि अभ्यास यांची प्रचिती येते. श्री. शाह गेली १५ वर्षे सातत्याने गुजराती वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन करीत आहेत, ही बाबही सोपी नसल्याचे

सांज ये गोकुळी...

वसंतातल्या संध्याकाळी आपल्या घरट्याकडे परतणारे विहग...
बोन्झाय- कुंडीतल्या या बोन्झाय लिंबास लागलेली फळे...

अमेरिकन काँग्रेसकडून भुजबळांना भेटीचे निमंत्रण

  मुंबई, ता. २३ - राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना अमेरिकन काँग्रेसकडून भेटीचे निमंत्रण देण्यात आलेआहे. अमेरिकेस भेट देण्याचे हे निमंत्रण तेथील संसदीय परराष्ट्र व्यवहार समितीअंतर्गत असलेल्या आशिया-पॅसिफिक विषयक उपसमितीचे रँकिंग मेंबर एफ. एच. फॅलेओमावेगा यांनी पाठविले आहे. श्री. भुजबळ यांना वॉशिंग्टन डी.सी. येथे अमेरिकन काँग्रेसच्या वरिष्ठ सदस्यांची भेट घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून भारत व अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी आणखी कोणते प्रयत्न करता येऊ शकतील, यादृष्टीने चर्चा करण्याची अपेक्षा निमंत्रणात व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या १० जानेवारी ११ ला अमेरिकेतील नॉर्थ डकोटा प्रांताचे सिनेट लीडर रॉबर्ट स्टेनजेम यांच्या नेतृत्वाखाली महिला लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने भुजबळ यांची भेट घेतली होती. भुजबळ यांच्या भेटीमुळे प्रभावित झालेल्या अलायन्स फॉर यूएस-इंडिया बिझिनेस या संस्थेचे अध्यक्ष संजय पुरी यांनी अमेरिकन परराष्ट्र व्यवहार (आशिया-पॅसिफिक) उपसमितीचे रँकिंग मेंबर व यूएस-इंडिया ट्रेड काँग्रेशनल टास्क फोर्सचे उपाध्यक्ष एफ. एच. फॅलेओमावेग

'डेक्कन ओडिसी' चे लवकरच पुनरुज्जीवन: एमटीडीसी बैठकीत निर्णय

मुंबई, ता. २२ - महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राचे वैभव असलेल्या 'डेक्कन ओडिसी' या लक्झरी ट्रेनचे उत्तम पद्धतीने लवकरच पुनरुज्जीवन करून राज्यांतर्गत तिच्या अधिकाधीक सहली आयोजित करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचा निर्णय आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) बैठकीत घेण्यात आला. हॉलेज आकारात कपात करण्यासाठी केंद्र शासनाकडे वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचा ठरावही करण्यात आला. राज्याचे पर्यटनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष छगन भुजबळ अध्यक्षस्थानी होते. बैठकीस पर्यटन राज्यमंत्री व महामंडळाचे उपाध्यक्ष रणजीत कांबळे, पर्यटन विभागाचे सचिव आनंद कुलकर्णी, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर तसेच महामंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात इको-टुरिझमचा विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महाराष्ट्र वनविकास महामंडळासमवेत सामंजस्य करार केला आहेय यानुसार संरक्षित वनहद्दीच्या बाहेर एमटीडीसीच्या माध्यमातून पर्यटक निवासासह अन्य आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. सं

'कसाब' ला फाशी- ऍड. उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन

  २६-११ च्या संपूर्ण मुंबई हल्ल्यामुळे जगाचे लक्ष्य ठरलेल्या नापाक कसाबला आज अखेर उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम करून देशातील प्रत्येक नागरिकास न्याय मिळवून दिला आहे. या खटल्यासाठी सरकारतर्फे शिकस्त करणार्‍या ऍड. उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन. (लवकरच संबंधित वृत्त वाचा)

नूतन वास्तुविशारद, अंतर्गत सजावटकारांनी शासन स्तरावर उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा: भुजबळ

  मुंबई, ता. १८ - नूतन वास्तूविशारद आणि अंतर्गत सजावटका कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना आता शासन स्तरावरही उत्तम संधी उपलब्ध होत आहेत, याचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी केले. येथील जे. डब्ल्यू. मॅरियॉट हॉटेलमध्ये काल रात्री नवव्या ड्युरियन सोसायटी इंटेरियर डिझाईन पुरस्कार वितरण श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले की, भारतीय स्थापत्यशास्त्र आणि अंतर्गत सजावट क्षेत्राला अतिशय समृद्ध आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक ज्ञात-अज्ञात कलाकारांनी विविध राजवटींच्या काळात विविध शैलींच्या माध्यमातून हा वारसा आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. त्याची जपणूक करतानाच ही परंपरा पुढे चालविण्याची आणि अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी युवकांवर आहे. अलिकडे शासन स्तरावर देखील साचेबद्ध वास्तूंच्या निर्मितीपेक्षा वैविध्यपूर्ण, आकर्षक तसेच अत्याधुनिक इमारती उभारण्यास शासन प्राधान्य देत आहे. खाजगी क्षेत्रात अधिक नावलौकिक, पैसा मिळत असला तरीही शासन स्तरावर उपलब्ध होणार्‍या संधींचा लाभ देखील कल्पक वास्तूविशारदांनी घ्यावा. य

उद्योग-व्यवसायातील संधीचा मराठी माणसाने लाभ घेण्याची गरज: छगन भुजबळ

  मुंबई, ता. २० - मराठी माणसाने आता नोकरी एके नोकरी चा पाढा सोडून उद्योग-व्यवसाय क्षेत्रातही उपलब्ध असलेल्या संधीचा लाभ घेऊन प्रगती साधण्याची गरज आहे. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात सॅटरडे क्लब बिझनेस एक्सलन्स पुरस्काराचे वितरणप्रसंगी केले. ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, जीटीएल कंपनीचे संस्थापक गजाननराव तिरोडकर आणि सॅटरडे क्लबचे सर्वेसर्वा माधवराव भिडे उपस्थित होते. यावेळी तिरोडकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. औरंगाबादच्या आर. जे. जोशी यांच्यासह २० विविध उद्योजकांना सन्मानित करण्यात आले. श्री. भुजबळ म्हणाले, की मराठी माणसाने आता उद्योगाविषयीची आपली नकारात्मक मानसिकता बदलण्याची गरज आहे. याला आवश्यक असलेल्या आर्थिक मार्गदर्शनासाठी माधवराव भिडे यांच्यासारखे अनेक दिग्गज आहेत. यांचे मार्गदर्शन व शासकीय पातळीवरील उपलब्ध सवलती, योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधण्यासाठी मराठी माणसाने पुढे येण्याची गरज आहे. यावेळी कुमार केतकर यांनी मराठी माणसाच्या उद्योगाविषयक नकारात्मक मानसिकतेची मीमांसा करताना अलिकडे अनेक मराठी उद्य

मराठी चित्रपटांच्या धर्तीवर नाट्यनिर्मितीसाठी अनुदान द्यावे - अजित पवार

  मुंबई, ता. १८ - मराठी चित्रपट निर्मितीसाठी दिल्या जाणार्‍या अनुदानाच्या धर्तीवर नाट्यनिर्मितीसाठी अनुदान देण्यात यावे. असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले. मराठी रंगकर्मींच्या समस्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीत ते बोलत होते. आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली नाट्य निर्मात्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध समस्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. नाट्यनिर्मात्यांना तांत्रिक कारणास्तव अनुदान मंजूर होत नाही, अशी अडचण सांगितल्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, की मराठी चित्रपटांना ज्या पद्धतीने अनुदान दिले जाते तीच पद्धत नाट्यनिर्मात्यांना अनुदान देण्यासाठी अनुलंबली जावी. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नाट्यगृह उभारले जावे. यासाठी जिल्हा विकास आराखड्यात निधीची तरतूद करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातील. नाट्यगृहांच्या उभारणीसाठी स्थानिक आमदारांच्या विकास निधीतूनही मदत घेता येईल. तसेच नागपूर येथे आणखी एक नाट्यगृह उभारण्यासाठी सांस्कृतिक विभागाने कार्यवाही करावी असेही निर्देश श्री. पवार यांनी दिले. सा

मध्य प्रदेशात पुन्हा थंडी

  थंडी पूर्ण जाणार अशी चिन्हं असतानाच पुन्हा एकदा मध्य प्रदेशात थंडीने डोके वर काढले आहे. दहा अंशांच्या वर सरकत चाललेला पारा पुन्हा एकदा प्रदेशातील काही भागात रात्री दहा अंशांवर स्थिरावला आहे. महाशिवरात्री  पर्यंत थंडी अशीच राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः अनेक मुलांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत आहे.

इंदूरमध्ये भूगर्भातून आवाज?

  शुक्रवारी (ता. 18) सकाळी सातपासून बराच वेळ शहराच्या पश्चिमेस भूगर्भातून मोठा आवाज ऐकू येत होता. विहीर खोदण्यासाठी सुरुंग लावल्यानंतर ब्लास्टिंग करताना होणाऱ्या आवाजाप्रमाणे हा आवाज येत होता. अनेकांनी याबाबत मोबाईलद्वारे एकमेकांकडे विचारणा केली. नेमका कुठून आवाज येत होता, हे समजू शकले नाही.
रस्त्यावरच्या 'ट्राफिक-जाम' मध्ये अडकले वाळवंटाचे जहाज   

शीर्षक सुचवा...इंदूरला येऊन मिठाई मिळवा...

कॉमेडी का फट़का...

बगळ्यांची माळफुले..अजुनी

वसंताच्या संध्याकाळी गच्चीत गेलो, आज काहीतरी वेगळा फोटो काढायचा असा विचार मनात घोळथच होता, इतक्यात ही मोठ्ठी बगळ्यांची रांग दिसली...चटकन क्लिक केले..नंतर ही ओळ (बगळ्यांची माळ फुले, अजुनी अंबरात...) नकळत तोंडातून बाहेर पडली...

पुण्याच्या चिंतन ग्रुप आयोजित निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद: 11 मार्चला पारितोषिक वितरण

  पुणे, ता. 17 - एड्स, लोकसंख्यावाढ, कुपोषण व गुटखा याविरुद्ध जनजागरण करणाऱ्या व सेवा परम् कर्तव्यम् मानणाऱ्या चिंतन ग्रुपच्या सेवा प्रबोधिनी संस्थेतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या 'भ्रष्टाचार व प्रतिबंधक उपाय' या ज्वलंत व धगधगत्या भ्रष्टाचार या विषयाशी निगडित निबंध स्पर्धा घेण्यात आली. पुणे विद्यापीठांतर्गत समाविष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेस पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रथम पारितोषिक रु. 1111/-, द्वितीय 751/-, तृतीय 501/- व उत्तेजनार्थ 251/- व सर्वांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र येत्या 11 मार्चला पुण्यात कै. द. वि. निकम स्मृती पुरस्कार कार्यक्रमात मान्यवरांना देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक निलेश दिलिप कोकाटे, गेणबा सोपानराव मोझे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, येरवडा, पुणे, द्वितीय- सौरभ वसंत उबाळे, डी. ई. एस. लॉ कॉलेज, पुणे, तृतीय- अजिंक्य अनिलराव शिंदे, मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव- पुणे यांना देण्यात आला. उत्तेजनार्थ - ताई भागवत धुमसे-श्री. साईबाबा शिक्षणशास्त्र महाविद्यालय कोपरगाव, परि

Reflection

Reflection...like mirror!

शासनांकडून केला जातोय 'सीबीआय' चा दुरुपयोग- जोगिंदरसिंह

  इंदूर, ता. १५ - सीबीआय ला तपास सुरू करण्यापूर्वी शासनाकडून परवानगी घ्यावी लागते. अनेक अशी प्रकरणे आहेत, ज्यात परवानगी मिळतच नाही. शासन कोणतेही असो, प्रथम आपल्या हिताचा विचार करूनच नंतर तपासाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला जातो. जोपर्यंत सीबीआयला 'फ्री हँड' मिळणार नाही, तोपर्यंत त्याचा दुरुपयोगच होत राहील. असे मत माजी सीबीआय-प्रमुख जोगिंदरसिंह यांनी व्यक्त केले. एका चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की केवळ हातावर हात ठेवून सुवर्ण पदक मिळू शकत नाही, त्यासाठी मेहनत आवश्यक असते. कायद्यात बदल करणे सध्या नितांत आवश्यक आहे. एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले, की काही प्रकरणांमध्ये राष्ट्रीय तपास आयोगाची आवश्यकता नव्हती, ही जबाबदारी सीबीआय देखील पार पाडू शकले असते. आरुषि प्रकरणाचे कोडे अद्याप उलगडले नसल्याच्या प्रश्नावर, सीबीआय जादू ची छडी नसून साक्षीदार, पुरावे मिळून देखील देशात शेकडो आरुषिंसारखी प्रकरणे अद्याप गुलदस्त्यात पडून आहेत. २जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सध्या फक्त राजा यांनाच संशयित म्हणून ताब्यात घेण्यात

व्हॅलेंटाइन...अडथळा अंतराचा..!

दिवसभर मित्र-मैत्रिणीसोबत घालवलेला काही तासांचा पण क्षणांप्रमाणे वाटणारा वेळ..भावी आयुष्य , मैत्रीच्या पुढच्या प्रवासात घालवायच्या आयुष्याची रंगविलेली स्वप्नं..रात्री झोपताना येणाऱ्या उद्याच्या कल्पनेचे कप्पे हृदयातून मनात साचवून झोपलेला तो किंवा ती...। खिडकीबाहेरून येणारा मंद वाऱ्याबरोबरचा सुवासाचा दरवळ..आणि , आणि सकाळी हळूच गालावर मोरपीस फिरल्याप्रमाणे त्याने किंवा तिने स्पर्श करून व्हॅलेंटाइन – डे च्या दिलेल्या शुभेच्छा..। एक काळ होता , त्या काळात घरातल्या महिलांनी परपुरुषाच्या समोर यायचे नाही. अगदी महत्त्वाचंच असल्यास अथवा संभाषण साधायचं असल्यास पडद्यामागे राहून बोलणी करायची..। या प्रघातामध्ये कालांतराने बदल होत जाऊन एकविसाव्या शतकात तर हे सगळं पडद्याआड गेलं आहे. वडील म्हणजे हिटलर वाटणाऱ्या मुलांना आता वडील म्हणजे मित्रच वाटू लागले आहेत. मुलगा आणि मुलगी यात फरक मानणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय. मुलांनी आणि मुलींनी एकमेकांशी बोलू नये , बघू नये..मुलीने मारुतीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करू नये अशा विचारांची बैठक आता बदललीये. सकाळी

मुंबई मॅरेथॉनप्रमाणेच मुंबई सायक्लोथॉनही आंतरराष्ट्रीय बनविणार- भुजबळ

  मुंबई, ता. १४ - मुंबई मॅरेथॉन आज केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाली आहे. हजारो आंतरराष्ट्रीय स्पर्धक यात सहभागी होतात. आता मुंबई सायक्लोथॉनचा देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त करण्याचे स्वप्न बाळगून असल्याचे आणि यासाठी प्रयत्नांना यशही मिळत असल्याचे स्पर्धेस मिळणार्‍या प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. स्पर्धेत अडथळा आणण्यासाठी दर करण्याकरिता भुजबळांची धाव आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उदघाटन केल्यानंतर सर्व स्पर्धक सी-लिंकच्या दिशेने रवाना झाले. यावेळी केबलस्टेडच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धकांची छायाचित्रे टिपण्यासाठी काही छायाचित्रकार मध्येच उभे होते. काही अक्षरश: रस्त्यावर आडवे झाले होते. आधीच्या राऊंडचे काही सायकलस्वारही नेमके याच मार्गाने उलटे येत होते. यांना भुजबळ यांनी रस्त्याच्या बाजूला उभे राहून छायाचित्रे काढण्याची विनंती केली.  स्पर्धेत सी-लिंकवरील एकूण १०४ किमी च्या १२ लॅप सुरळीत आणि उत्कंठापूर्ण पद्धतीने पार पडल्या.

अमेरिकेचा रॉबी हंटर 'मुंबई सायक्लोथॉन' चा विजेता

  मुंबई, ता. १३ - अत्यंत उत्साहात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मुंबई सायक्लोथॉन 'टूर द मुंबई-२०११' मध्ये आज अमेरिकेच्या रेडिओशेक टीमच्या रॉबी हंटर याने राजीव गांधी सागरी सेतूच्या साक्षीने १०४ किमी. चे अंतर पार करून विजेतेपद पटकाविले. इटलिच्या लिक्विगॅस टीमचा इलिया व्हिव्हियानी आणि यूके मोटरपॉईंट टीमच्या जॉनी एकव्हॉय यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. यांना अनुक्रमे १५ हजार, सहा हजार आणि तीन हजार युरोचे बक्षीस मिळाले. भुजबळ फाऊंडेशन, आयडी स्पोर्ट्स, युनियन सायक्लिक इंटरनॅशनल आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या सायक्लोथॉनमध्ये १२ देशांचे विविध संघ तसेच तीन देशांच्या राष्ट्रीय संघांच्या सुमारे १०८ स्पर्धकांनी भाग घेतला. यासह २८ किलोमीटरची ऍमॅच्युअर राईड, प्रत्येकी १५ किलोमीटरच्या कॉर्पोरेट व ग्रीन राईड्स, ३ किलोमीटरची किड्स राईड अशा अन्य विभागांमध्ये एकूण ९५०० पेक्षा अधिक सायकलस्वारांनी सहभागी होऊन "पर्यावरण रक्षणासाठी सायकल चालवा" हा संदेश दिला. १२ आंतरराष्ट्रीय संघांव्यतिरिक्त भारताच्या स्पर्धकांनीही या स्प

इटलीचा विवियानी इलिया आंतरराष्ट्रीय रेसमध्ये; कर्नाटकचा साबू गांगर राष्ट्रीय स्पर्धेत विजेते

  नाशिक (वार्ताहर) - नाशिक फेस्टिव्हल निमित्ताने भुजबळ फाऊंडेशन आणि आयडी स्पोर्ट्स आयोजित आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा शुक्रवारी नाशिकमध्ये उत्साहात संपन्न झाली. इटलीच्या 'लिकवी गॅस' टीमचा विवियानी इलिया तर राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटकचा साबू गांगर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना अनुक्रमे सहा हजार युरो आणि सव्वालाख रुपयांचे बक्षीस राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकचे खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत देण्यात आले. स्वीस येथील इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन, द युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल आणि इंडियाज सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी भारतात 'टूर द मुंबई' ही नाशिक आणि मुंबई येथे दोन टप्प्यात सायक्लॉथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचा दुसरा टप्पा रविवारी मुंबईत संपन्न झाला. नाशिकच्या स्पर्धेत सुमारे पाच हजार दोनशे सायकलस्वारांनी सहभाग घेतला. यात १०८ आंतरराष्ट्रीय, ६८ राष्ट्रीय स्पर्धक होते. उर्वरित स्पर्धकांमध्ये नाशिक शहरातील आम नागरीक, तरुण तरुणी आदींचा समावेश होता. सुमारे २५ हजार नाशिककरांनी विविध रेस पाहिल्या. आंतरराष्ट्रीय स्पर्धक

'गुरू' ची मागणी अमान्य करण्यातच शहाणपण...

  १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरू याने आपल्याला जम्मू-काश्मिर येथील तुरुंगात हलविण्यात यावे अशी मागणी केली आहे. शासनाने गुरूची ही मागणी सपशेल अमान्य करावी. फाशीची शिक्षा ठोठावण्यात या देशद्रोह्याला अद्याप फाशी झाली नाही, परंतू त्याची मागणी शासन अमान्य करीत असल्याचे ऐकून तरी या हल्ल्यात क्षती पोहोचलेल्यांच्या कुटुंबियांना धन्य वाटेल. संसदेवर हल्ला करून संसदेचे किंबहुना संपूर्ण देशाचेच पावित्र्य आणि शांतता भंग करणार्‍या अफजल गुरूला फाशीची शिक्षा सुनावून बरेच दिवस उलटले. परंतू दुर्दैवाने अद्याप यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. आपल्या सुरक्षा यंत्रणेने त्वरीत सडेतोड प्रत्युत्तर देऊन चार अतिरेक्यांना कंठस्नान घालून यमसदनी पाठविले हे कौतुकास्पद आहे. मुंबई हल्ल्यातील एकमेव आरोपी अजमल कसाब यालाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येत्या २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने त्याच्या फाशी संदर्भात आपला निर्णय राखून ठेवला आहे. निर्णय होईल तेव्हा होईल, परंतू देशद्रोही, अतिरेक्यांच्या फाशीसाठी इतका विलंब होत असल्यामुळे सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरचा आणि शासनावरचा

शुक्रवारी नाशिक येथे नाशिक सायक्लोथोनचे आयोजन

  शुक्रवार , दि. ११ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे नाशिक सायक्लोथोनचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे येत्या रविवारी दि. १३ फेब्रुवारी , २०११ रोजी मुंबई सायक्लोथोनचे ( Tour-de-Mumbai-2011) आयोजन करण्यात आले आहे. या सायक्लोथोनचे प्रमुख आयोजक असलेल्या आय. डी. स्पोर्ट्सच्या वतीने सायक्लोथोन च्या प्रसिद्धीसाठी प्रसिद्ध फशन डिझायनर नीता लुल्ला यांच्या कलेक्शनचा फेशन शो नुकताच मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी ramp वर सायकल चालवून उपस्थिताना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आणि सायकल चालवण्याचे महत्व सांगितले. सायक्लोथोन मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांच्या सोबत खासदार समीर भुजबळ , आमदार पंकज भुजबळ , नीता लुल्ला आणि आय. डी. स्पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक अकिल खान उपस्थित होते.

झाडावरील नारळ काढण्याची समस्या

  पर्यावरण संतूलनासाठी गेल्या काही वर्षात लोक चांगलेच जागरूक झाले असून घरासमोर विविध झाडे, वेली, वृक्ष लावून पर्यावरणावरचे आपले प्रेम सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक ठिकाणी नारळाचे वृक्ष देखील लावण्यात आले असून ठिकठिकाणाच्या नारळाच्या झाडांना फळे लागत असल्याचे दिसते. परंतू नारळाची झाडे बरीच उंच असल्यामुळे झाडाला लागलेली फळं काढता येणे शक्य होत नाही. झाडावरील फळं (शहाळे) काढण्यासाठी नारळाच्या झाडावर चढणारे भरपूर पैसे घेत असल्याची तक्रार असून यापेक्षा फळ झाडावरच असलेले चांगले अशी भावना लोकांची झाली आहे.

टीम से बाहर रखनें पर "हसी" को 'हसी'...

आगामी विश्वचषक क्रिकेट मैचों से ऑस्ट्रेलिया टीम के फ़िल्डर मायकल हसी इन्हें बाहर रखा गया है। चयन समिती के इस निर्णय से हसी को हसी आयी है। इंग्लैंड के ख़िलाफ एकदिवसीय मैच में हसी ज़खमी हुए थे। उनकी इस ज़खम से खिलवाड कर चयन समिती नें हसी इनके दिल को ठेंस पहुचाई है, और समिती के निर्णय पर हसी आ रही है, ऐसा श्रीमान हसी इन्होंनें वक्तव्य किया है।

इंदूरच्या किमान तापमानात वाढ

  ११ अंश सेल्सिअसवर स्थिरावलेल्या इंदूर शहराच्या किमान तापमानात गेल्या दोन दिवसापासून दोन अंशांनी वाढ झाली असून काल (ता. ९) शहराचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसाचे तापमान  देखील वाढतच असून रात्री देखील काही घरांमध्ये पंखे सुरू करण्याची गरज भासत आहे.

सिडकोतर्फे औरंगाबाद झालरक्षेत्राचा विकास आराखडा प्रसिद्ध

औरंगाबाद, ता. ९ - सिडकोने औरंगाबाद महानगर पालिका हद्दीलगत २८ गावातील १५००० हेक्टर क्षेत्राच्या औरंगाबाद झालर क्षेत्राकरिता प्रारूप विकास आराखडा ३ फेब्रुवारीला महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम १९६६ च्या कलम २६ (१) अन्वये प्रसिद्ध केला आहे. या आराखड्यात समाविष्ट प्रस्ताव, तपशिलात्मक अहवाल आणि विकास नियंत्रण नियमावली संदर्भात इच्छुकांकडून सूचना व हरकती मागविण्यासाठी ७ फेब्रुवारी २०११ रोजी वृत्तपत्रांमधून जाहीर सूचना प्रकाशित करण्यात आली आहे. शासनपत्रात ही जाहीर सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात इच्छुकांनी आपल्या सूचना व हरकती सादर कराव्यात. हा प्रारूप विकास आराखडा अवलोकनार्थ सिडको च्या निर्मल, नरिमन पॉईंट, मुंबई येथील कार्यालयात तसेच नियोजन विभाग, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई आणि सिडको कार्यालय,  नवीन औरंगाबाद येथे उपलब्ध आहे. तसेच हा आराखडा परिशिलनाकरिता जिल्हाधिकारी औरंगाबाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद मुख्य प्रशासक (नवी शहरे), सिडको नवीन औरंगाबाद, उपसंचालक, नगर नियोजन विभाग, औरंगाबाद, सहाय्यक संचालक, नगर नियोजन विभाग औरंगाबाद, तहसि

फुलला वसंत...

वसंत पंचमी म्हणजेच प्रफुल्लित मन, टवटवी, हिवाळ्याने सुस्तावलेल्या चराचर सृष्टीला ऊब देऊन फुलं उमलली नाहीत, कोकिळेचे कुंजन आणि सृष्टीचे गुंजन स्वर ऐकू आले नाहीत, तर नवलच...!!!

राज्यात इलेक्ट्रॉनिक टोलवसुलीसह 'ई-टॅग' योजना प्रायोगिक तत्वावर राबविणार

मुंबई, ता. ७ - राज्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोलवसुलीसह 'ई-टॅग' योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्याची तसेच काही पथकर नाके बंद करण्याची शिफारस आज संबंधित समित्यांनी प्रस्तावित केल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पथकराचे धोरण अधिक पारदर्शी होण्याच्या दृष्टीने काही सुधारणा आवश्यक असल्याचे सुचविले होते. त्या अनुशंगाने शासनाने तीन स्वतंत्र समित्या नियुक्त केल्या आहेत. या समित्यांची बैठक गेल्या महिन्यात श्री. भुजबळ यांनी दोनदा घेतली होती. आज सायंकाळी रामटेक निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या समित्यांनी केलेल्या शिफारशींची माहिती श्री. भुजबळ यांनी दिली. श्री. भुजबळ म्हणाले, की खाजगीकरणाचे धोरण व पथकर प्रणाली रस्त्यांच्या विकासासाठी जागतिक स्तरावर देशात वापरली जाते. राज्यातही या पद्धतीचा अवलंब करून सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. देशातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्पही राज्यातच राबविला गेला. या धोरणामुळे रस्ते विकासात खाजगी गुंतवणूक होऊन राज्याची अर्थसंकल्पीय तरतूद कमी वाहतुक असलेल्या

लवकरच मासिक राशीभविष्य...

  आपल्या सर्व वाचक, मित्रमंडळी, हितचिंतक आणि ज्येष्ठ श्रेष्ठांच्या छान प्रतिसादामुळे या छोट्याशा ब्लॉगवर आणखी काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे. सर्वांच्या जिव्हाळ्याचे मासिक राशीभविष्य यापुढे आपणांस दरमहा या ब्लॉगवर वाचता येईल. धन्यवाद..